Cm Maharashtra – भावी महिला मुख्यमंत्री कोण ?
Cm Maharashtra – महाराष्ट्राची भावी महिला मुख्यमंत्री कोण ? मुलाखत – भाग ५ : रजनीताई अशोकराव पाटील
महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीत आणखी एक नाव म्हणजे रजनीताई अशोक पाटील, जाणून घेऊया त्यांच्या सोबत झालेल्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला महिला सक्षमीकरणासोबत सक्षम नेतृत्व देण्यास त्या किती समर्थ आहेत. चंपानगरी हे बिंदुसरे नदीकाठी वसलेले एक ऐतिहासिक गाव. जेथे महादजी शिंदे यांचे गुरु ”मन्सूरशहा” यांचे वास्तव्य होते. ते आज बीड या नावाने ओळखले जाणारे मराठवाड्यातील जिल्ह्याचे ठिकाण आहे. माझे तेथे १९९० ते ९२ या काळात वास्तव्य होते. या काळात कै. माधवराव शिंदे महाराज, ग्वाल्हेर यांनी आपल्या घराण्याचे गुरु “मन्सूरशहा” यांचे दास दिलेली धावती भेट आजही माझ्या स्मरणात आहे. तेथे असताना सकाळी वर्तमानपत्र उघडले की डोक्यावर पदर घेतलेल्या सतत हसतमुख चेहऱ्याच्या म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या महिलेचा अधूनमधून फोटो पाहिला की, मी त्या व्यक्तीबद्दल आदर आणि मान सन्मान वाटे अशा व्यक्तीला भेटावे असे नेहमी वाटत असे.
गेली १० वर्षे जे शक्य झालं नाही ते सहज घडून आलं. करोनाच्या या दिवसात हे शक्य न्हवते पण अनलॉकमुळे वेळ मिळाला आणि हे शक्य झाले, Cm Maharashtra सौ. रजनीताई पाटील यांची पुण्यात भेट झाली. त्यामुळे फार प्रवासाचा ताण तणाव आला नाही. मलाच काय पण सर्वांनाच त्यांच्याविषयी जाणून घेणे आवडणारच होते म्हणून मी त्यांच्या सिंहगडरोड पुणे येथील निवासस्थानी भेट दिली. पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि., केज, जि. बीडच्या त्या अध्यक्षा होत्या. त्या या साखर कारखान्याचा एक कार्यक्रम संपवून त्या आठ दिवसांनी पुण्यात आल्या होत्या. भेटीची वेळ मिळताच आम्ही चांगले दोन-तीन तास थांबण्याच्या तयारीत होतो. आमचे स्वागत रजनीताईंनी त्यांना शोभेल असे सुहास्य वदनाने केले.
पहिलान नमस्कारच अगत्यपूर्ण होता. बोलण्याची सुरुवात खाजगी कौटुंबिक गप्पातूनच झाली. ताई, तुमच्याविषयी आम्हा सर्वांना बरेच काही जाणून घ्यावयाचे आहे असे म्हणताच बोलणं कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरु झालं. त्या म्हणाल्या, ”माझे वडील आत्माराम बापू पाटील, बोरगाव,
ता. वाळवा, जि. सांगली येथील रहिवासी मागच्या पिढीतील लोकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून परिचित होते. त्यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. ते स्वातंत्र्य चळवळीत १३-१४ वर्षे अत्यंत सक्रीय होते. त्यांनी बराच काळ तुरुंगवास भोगला होता. त्यांना
दोनदा आजन्म कारावासाची शिक्षा स्वातंत्र्य चळवळीत झाली होती. काका जनार्दन व रामचंद्रनाना यांनाही स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. एकाच कुटुंबातील ३ भाऊ तुरुंगवास भोगलेलं आमचं कुटुंब होतं. जनार्दनकाकांचा विवाह तुरुंगात झाला होता.
काकींनी तुरुंगात जाऊन त्यांच्या गळ्यात सुताचा हार घालून गांधी पद्धतीने विवाह केला होता. इंग्रज सरकारने आमची सर्व शेती जप्त केली होती. राजकारणामध्ये वडीलांचा चांगला सहभाग होता. १९३७ साली ते पार्लमेंटरी बोर्डावर निवडून गेले होते. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरुही
त्या पार्लमेंटचे सदस्य होते. ते देशात प्रथम क्रमांकाच्या मतांनी तर वडील दुसऱ्या क्रमांकाचे मतांनी निवडून आले होते. वडिलांनी स्वातंत्र्याच्या काळात गोवा मुक्ती संग्रामातही भाग घेतला होता. आईचाही स्वातंत्र्य चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामात मोठा सहभाग होता. माझे आजोबा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्वातंत्र्यवीर होते. ते गदर मुव्हमेंटचे संस्थापक होते. त्यांना इंग्रज सरकारने १९१५ साली लाहोर येथे फाशी दिली. माझ्या व्यक्तिगत जीवनावर या कौटुंबिक पार्श्वभूमीचा परिणाम आहे. त्याकाळी घरामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. थोरामोठ्यांचे येणे जाणे असे. त्यांचा सहवास लाभला. बालपणातील आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. त्यावेळी आम्ही राहत असलेल्या सदाशिव पेठेत मात्र जनसंघाचा प्रभाव होता.
माझी सभासंमेलनाला उपस्थिती असेच. मात्र वयाच्या ७ वर्षी मोठ्या दुःखद प्रसंगाला व परिस्थितीला सामोरे जावे लागले ते वडीलांचे निधनाने. आईने आम्हा चार भावंडांचे संगोपन-शिक्षण मोठ्या जिद्दीने केले त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झालेल्या होत्या.” सौ. ताईंनी पुणे येथील एस. पी. महाविद्यालयातून बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यावेळी त्या यू.आर. म्हणून निवडून आल्या होत्या. १९७९ साली त्यांनी पुणे विद्यापीठाच्या सीनेटवरही प्रतिनिधीत्व केलेले होते. त्या नॅशनल स्टुडन्टस्, युनियन ऑफ इंडियाच्या जनरल सेक्रेटरी होत्या. “नॅशनल स्टुडन्टस् युनियन ऑफ इंडियातील चळवळीचा तुमच्या व्यक्तीगत जीवनावर काय परिणाम झाला ?” असा खोचक प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “तिथेच माझा श्री. अशोकराव पाटील यांच्याशी परिचय झाला आणि दोन्ही कुटुंबातील मंडळींनी १९८२ साली आमचा विवाह घडवून आणला. श्री. अशोकराव पाटील हे ही युवक कार्यकर्ते होते. पुढे त्यांना केज (जि. बिड) या मतदार संघातून काँग्रेसचे तिकिट मिळाले. ते निवडून आले. मा. शंकरराव चव्हाण, ज्यांच्यामुळे आमचा राजकीय
प्रवास सुखद झाला, ज्यांच्याकडून प्रशासन म्हणजे काय?, ते शिकलो, अशा दिपस्तंभाप्रमाणे असलेल्या व्यक्तीच्या मंत्रीमंडळात श्री अशोकराव पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून समावेश झाला. मी व माझे पती यांनी एकत्रीत पुढे काँग्रेस पक्षाचे कार्य केले. त्याचवेळी १९८७
मध्ये कै. राजीव गांधी यांनी दुष्काळी दौऱ्यात केजला भेट दिली होती. त्याच वेळी सहकारी साखर कारखान्यास मंजूरी दिली होती. त्या कारखान्यास महाराष्ट्रात ज्यांनी पाहिल्या साखर कारखान्याची स्थापना केली होती त्या पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील यांचे त्यांच्या महान
कार्याची आठवण राहावी म्हणून नाव दिले. कै. राजीव गांधी केज येथे ज्या ठिकाणी भाषण केले होते. त्याच जागी हा कारखाना उभारला आहे. या कारखान्याच्या शुभारंभासाठी श्रीमती सोनिया गांधी येत आहेत.” माझ्या प्रश्नाच्या अनुरोधाने Cm Maharashtra सौ. ताई आपल्या राजकीय कार्याविषयी
बोलत होत्या. “मी १९९२ मध्ये पहिली जिल्हा परिषद निवडणूक लढविली. निवडून आले. ५ वर्षे जिल्हा परिषदेत काम केले. राजकारणाबरोबर समाजकारणातही ताईचा महत्त्वाचा सहभाग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रयत्न करीत आहेत.”आणखी काय कार्य चालले आहे? “सरकार जे आर्थिक सहाय्य करते ते सर्व महिलांच्याकडे सोपवून कष्टातून व पाण्याच्या नियोजनातून देशाच्या केलेल्या उभारणीने त्या “समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठा नाही. महिलांनी बचत करुन जमलेल्या पैशावर रिझर्व बँकेकडून कर्ज घेऊन महिलांनी गृहउद्योग करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अंगणवाडी तसेच मुलांच्यासाठी केंद्र
त्यांच्याकडून भरीव कार्य होणे आवश्यक आहे. त्याबाबत मी प्रयत्नशील आहे. गणवेश पुरविण्याचे काम हे व्यापाऱ्यांकडे सोपविण्याऐवजी महिलांकडे सोपवणे गरजेचे आहे. याचा खर्च जवळजवळ ५-६ कोटी आहे. तो कार्यक्रम महिलांच्या मार्फत होणे आवश्यक आहे. दूधसंस्था,
दूधसंघाचे कामही महिलांना दिले पाहिजे. अशा अनेक मागण्या आहेत, त्याचा पाठपुरावा चालू आहे.” “शेवटी युवकांसाठी आपला काही संदेश आहे का ?” असे विचारताच त्या म्हणाल्या,
“देशाची परिस्थिती तर आता सर्व मतदार युवकांवर आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आहे. युवकांनी धडपड करुन शेतकऱ्यांच्या शेती मालासाठी परदेशी बाजारपेठ निर्यातीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवनवीन क्षेत्रात त्यांनी प्रवेश करुन भरीव कार्य करावे, असे वाटते.
देशातील सामाजिक,धार्मिक स्थिती पाहता जाती व्यवस्थेविरुद्ध, समाज विघातक जात्यांध शक्तीविरुद्ध लढले पाहिजे. सर्व युवक-युवतींनी बाहेर पडून स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे सर्व वाईट शक्तींविरुद्ध लढा दिला पाहिजे. झोकून काम केले पाहिजे.” खूप वेळ झाला होता. सौ. ताईंच्या परदेश दौऱ्याविषयी विस्ताराने बोलणे झाले नाही. मात्र गल्फ देशात कमी पाणी असताना त्यांनी कष्टातुन आणि मेहनतीने पाण्याचे योग्य नियोजन देशाच्या उभारणीत केल्यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ प्रसिद्धीच्या विषयावर चर्चा झाली. या ग्रंथासाठी सौ. ताईंनी उत्तरप्रदेशच्या मायावती सरकार कडून ५ लाख रुपये अनुदान मिळवून
दिले होते. तथापि, या कर्तृत्वशालिनीशी खूप काही बोलायचे राहूनच गेले. महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदासाठी रजनीताई यांचे कामच खूप बोलके आहे.
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.
Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,
News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Postbox Editorial

www.postboxindia.com