Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

chief minister of Maharashtra – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ?

1 Mins read

chief minister of Maharashtra – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ?

 

 

chief minister of Maharashtra – महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ? मुलाखत – भाग – ४  सौ. वैशाली विलासराव देशमुख

 

 

  महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री कोण ? या सदराखाली ज्या व्यक्तिमत्वांची चर्चा आणि मुलाखत आपण इथे सादर करीत आहोत त्यामध्ये ही मुलाखत नसेल तर संपूर्ण सदराच्या सादरीकरणाला पूर्णत्व येणार नाही आणि ती मुलाखत म्हणजे सौ. वैशाली विलासराव देशमुख यांची. हसत खेळत राजकारणातला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पडला शोभेसा आणि कर्तृत्ववान चेहरा अर्थात विलासराव देशमुख. ते ज्या ज्या कार्यक्रमाला हजर असायचे त्या त्या कार्यक्रमाला वाहिनी त्यांच्या सोबत असल्यामुळे एक वलय विलासरावांभोवती कायम दिसायचे. आज साहेब आपल्यामध्ये नाहीत त्यांची कमतरता संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. chief minister of Maharashtra विलासराव यांच्याइतके अभ्यासू, कुशल प्रशासक, निर्णयक्षमता, मनमिळावू नेतृत्व आणि सर्वाना सोबत घेऊन जाणारे संयत, संयमी नेतृत्व आजच्या विरोधी पक्षात त्याच्या जवळपास जाणारे एकही नाही. आम्ही पूर्णा या त्यांच्या वरळी येथील घरी प्रवेश केला. वैशाली वहिनींनी अगदी मन भरून हसून आमचे स्वागत केले. खूप दिवसांची आम्हा सर्वांची साहेबांच्या वास्तूला भेट देण्याची  अपूर्ण इच्छा पूर्ण होणार म्हणून मलाही खूप आनंद झाला होता. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही मुलाखतीला सुरुवात केली. माझा पहिला प्रश्न. “वहिनी प्रथम आपण माहेरवरुनच सुरुवात करुया. आपण आपल्या माहेरविषयी सांगा. “माझं माहेर पळशी, आंध्र प्रदेशातलं. परंतु माझे शिक्षण मात्र जवळच्याच म्हैसा या गावी झाले. मी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. लगेचच माझे लग्न ठरल्यामुळे इच्छा असूनही पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागले. जिल्हा परिषद अध्यक्ष रंगराव जहागीरदार यांची मी कन्या.
पारंपारिक खानदानी घरात माझं बालपण गेले होते. त्यामुळे रीतसर मागणी घालूनच माझा विवाह झाला आहे.”

“साहेबांच्या राजकारणाविषयी आपल्याला कल्पना होती का ? “लग्नाच्या वेळीही साहेब राजकारणात होते व पुढेही हे चालूच
राहणार याची मला पूर्ण कल्पना होती. माझे वडीलही राजकारणात असल्यामुळे माझ्या दृष्टीने राजकारण काही नवीन नव्हते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चढउताराची सर्व गोष्टींची कल्पना मला होती.” “आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण ?” chief minister of Maharashtra “मुख्यमंत्री म्हणून साहेबांचे नाव जेव्हा जाहीर झाले तेव्हा आमच्या आनंदाला खरोखरच सीमा नव्हती. साहेबांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. लातूरमध्ये जनतेने जेव्हा साहेबांचा मोठा जाहीर साकार केला. तेव्हाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करु शकत नव्हते. आणखी एक आनंदाचा क्षण म्हणजे २९ मे २००० रोजी आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आमच्या मुलांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला. सर्व आप्तस्वकीयांनी आम्हा दोघांवर प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव केला. मन
आनंदाने भरून गेले. तो दिवस मी कधीही विसरु शकणार नाही. डोळे पुसत पुसत वाहिनी आठवणींमध्ये गेल्या. आम्हालाही साहेबांच्या आठवणीने गलबलून आले. परंतु मुलाखत तशीच पुढे सुरु ठेवत प्रश्न केला.

“आपल्या स्वतःविषयीच्या काही अपेक्षा होत्या का?” “माझ्या स्वतःच्या काही वेगळ्या गोष्टी आणि अपेक्षा असाव्यात असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. लातूरचे देशमुख घराणे म्हणजे मोठे मानाचे घराणे. गावचे देशमुख असल्यामुळे गावातला मानपान तिथलं त्यांचं स्थान या सगळ्यांची मला कल्पना असल्यामुळे माझे आयुष्य मी माझ्या घरापुरतेच मर्यादित ठेवले होते. माझं कुटुंब हेच माझं सर्वस्व आहे. या माझ्या कुटुंबात मी पूर्ण आनंदी व समाधानी आहे.” “साहेब आपल्याला कितपत वेळ द्यायचे ?” “वेळ मिळेल तेव्हा ते आम्हांला वेळ द्यायचे. ऑफिस व बाहेरचे दौरे संपले की ते सरळ घरी यायचे. बाहेरची कामे संपली की ते कुटुंबात राहणं नेहमीच पसंत करायाचे. वर्षातून एकदा सुट्टीत जसा वेळ मिळेल तसे बाहेर जाऊन आम्ही यायचो. साहेब राज्यमंत्री होते तेव्हा थोडासा वेळ मिळत होता, तेव्हा नाटक-सिनेमा पाहून होत असे. आमच्या घरातल्या सगळ्यांच्या
आवडीचा विषय म्हणजे सिनेमा बघणं. त्यावर चर्चा करणं. आम्ही तेव्हा आठवड्यातून एकतरी चित्रपट पाहत असू. नाटकं बघायलाही आवडतात; पण नाटकांना जायला वेळच मिळत नाही. ‘चारचौघी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ही नाटकं आवर्जून पाहिली होती. साहेबांना पं. जसराज, पं. भीमसेन जोशी यांच्या मैफिली अत्यंत आवडत होत्या. ही संधी मात्र ते कधीच सोडत नसायचे. मलाही लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी तर गुलाम अलीच्या गझला ऐकायला खूप आवडतात.”
“मुलांबद्दल थोडसं ” “मला तीन मुले. मोठा अमित केमिकल इंजिनिअर आहे. तो फॅक्टरी व बँकांची कामे पाहतो. त्याला व्यवसायाची आवड असल्यामुळे तो व्यवसाय सांभाळतो. त्याला त्याच्या व्यवसायतली अनेक पारितोषिकही मिळाली आहेत तो ही वडिलांप्रमाणे राजकारणात सक्रिय झाला आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

दुसरा रितेश, तो न्यूयार्कला आर्किटेक्टच पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला. तिथेच त्याला अभिनयाची संधी मिळाली.सध्या तो चित्रपटात बिझी आहे. जेनेलिया सारखी गोड सून आम्हाला गॉड गिफ्ट मिळाली, धाकटा धीरज पुढील शिक्षणासाठी लंडनला गेला होता.आता लातूरला राजकारणात सक्रिय झालाय.  “आपलं दिवसभराचं वेळापत्रक कसे असते?” “तसा दिवसभर मला भरपूर वेळ असतो. सकाळचा चहा आधी साहेबांबरोबर घ्यायची सवय आता एकटीच घेते, वहिनींचे डोळे पाणावले. वाहिनी खरंच खूप हळव्या आहेत. प्रत्येक आठवणीत साहेबांचे नाव आले की त्यांना भरभरून येते. महाराष्ट्राला काळजीपूर्वक सांभाळून घेण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे कारण साहेबांच्या जाण्याचे दुःख मन हळवे असले तरी त्या पचवू शकल्या यावरून प्रसंगी कठोरता हा त्यांचा गन विशेष इथे आम्हाला दिसला. पेपरवाचन, टी.व्ही. वरच्या बातम्या या सगळ्या गोष्टी झाल्या की मग माझ्या घरातल्या कामांना सुरुवात होते. सकाळी पेपरमधल्या ठळक बातम्या वाचून काढते. एखादी बातमी महत्त्वपूर्ण वाटली तर ती मूळापासून वाचून काढते. टी.व्ही. वरच्या बातम्या, काही मालिका, चित्रपट पहायला आवडतात.

“सध्या या टी.व्ही. वरच्या अनेक मालिकांबद्दल विविध प्रकारे मतभिन्नता आहे. यावर आपले मत काय?”
“आताच्या मालिका बघायच्या आणि विसरून जायच्या असतात. मला आवडणाऱ्या मालिका म्हणजे ‘कुसुम’, सांस भी कभी बहू थी’,अशा होत्या. आताच्या मालिकांची नावे सुद्धा आठवत नाहीत. यातला काही आदर्श भाग घ्यायचा आणि नको तो सोडून द्यायचा,
चांगलं ते घ्यायचं व क्लेशकारक सोडून द्यायचं हे भान जर ठेवून मालिका पाहिल्या तर त्यात काहीच नाही.”
“आज chief minister of Maharashtra साहेब नाहीत मग आपण इतरांबरोबर म्हणजे मुलांसोबत सहकुटुंब फिरायला जाता का?” “राजकारणी लोक सतत प्रसिद्धीच्या वलयात असतात. त्यामुळे
काही गोष्टी करता येत नाहीत. रितेशचा फॅन फॉलोवर खूप आहे, त्यामुळे आम्हाला उघडपणे असे एकत्र जायला खूप त्रास होतो. लोकांना नाराज करता येत नाही पण कोणतीच काम सहसा होत नाहीत. एखाद्या दिवशी निवांतपणे चौपाटीवर जावं किंवा थिएटरमध्ये जाऊन एखाद्या सिनेमा पाहावा असे वाटले तरी ते करता येत नाही. त्यात करोनामुळे सर्व थिएटर आणि सिनेमागृहे बंद आहेत. कुणीतरी ओळखीचे भेटतच असते, आता या सगळ्या गोष्टीची आम्हाला सवय होऊन गेली आहे. हा आमच्या जगण्याचा एक भाग होऊन गेला आहे. करोनामुळे आता सोशल डिस्टंसिंग आम्ही सर्व पाळतो. मास्क वापरतो. शक्य तितकी कुटुंबाची काळजी आम्ही घेत असतो. स्वीकारलेल्या मार्गाने तडजोड करत राहणे हेच आमचे ध्येय सुद्धा आहे. काही गोष्टी जोडाव्या लागतात तर काही गोष्टी सोडाव्या लागतात. प्राप्त परिस्थितीत आनंद मानून घेतला तर कसलाच त्रास होत नाही.

“राजकारणातील चढउताराविषयी आपले मत?” “जीवनात चढउतार हे असणारच. आज मुख्यमंत्री तर उद्या मंत्री असंही होणार, याचीही पुरेशी जाणीव त्यांनी आम्हाला तेव्हा दिल्यामुळे ते मुख्यमंत्री पदावरुन दूर झाले तरी त्याचा त्रास आम्हाला कधीच झाला नव्हता, साहेब तर सारखे म्हणायचे गेल्याचं दुःख मानत
बसायच नाही. जे मिळालंय त्याचं समाधान मानायचं. आपण कुठे गेलो, आपल्यापेक्षा मागे किती राहिले? ते बघायचं आणि आनंद मानायचा.’
“त्यांच्या या चांगल्या दृष्टीकोनाचा आमच्या संपूर्ण कुटुंबावर चांगलाच परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा आम्ही सहज
स्वीकार करु शकतो. त्यांची सर्व कामात खूपच शिस्त असायची. मी मात्र त्यांच्या मागे मागे राहणेच पसंत करत होती. त्यांच्या कार्यक्रमांना प्राध्यान देऊन मग आपले कार्यक्रम आखत होती. घरच्या जबाबदाऱ्या सर्वस्वी मी उचलत होती आणि आताही उचलते म्हणजे त्यांना पूर्णपणे आपल्या क्षेत्रात काम करता यायचे. त्याप्रमाणे त्यांना कधीही घरात फारसं काही बघावं लागलं नसायचे. सगळ्याच दृष्टीने जीवनातील चढउताराबरोबर त्यांना साथ देत त्यांची
पत्नी म्हणूनच माझी ओळख असणं यातच मी धन्यता मानते.

” वाहिनी यावेळी मात्र हसत होत्या. आम्हाला त्यांच्यातली कणखरपणा भावला. विलासराव त्यांच्याशिवाय अपूर्ण होते. आणि chief minister of Maharashtra विलासरावांशिवाय महाराष्ट्र अपूर्ण भासतोय. वैशाली वाहिनी मुख्यमंत्री पदावर आल्या तर कदाचित ही उणीव कमी होईल असे तरी त्या क्षणाला वाटले. वहिनींच्या मागे विलासरावांची हसरी छबी असलेली तसवीर आम्हाला बरच काही सांगून गेली. आम्हाला आणि महाराष्ट्राला वहिनींच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदावर एक सक्षम कर्तृत्ववान महिला मुख्यमंत्रीच दिसत होती.

 

 

 

Postbox editorial 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

%d bloggers like this: