Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

chhatrapati shivaji maharaj – १७ ऑगस्ट १६६६

1 Mins read

chhatrapati shivaji maharaj –  १७ ऑगस्ट १६६६

 

वरील तारीख सामान्य तारीख नाही. एकेका दिवसाचंही भाग्य असतं. या दिवसाला असंच महाभाग्य लाभलं आहे.

मराठ्यांच्या इतिहासात हा दिवस म्हणजे काळजात कोरून ठेवावा असा दिवस आहे. काय घडलं या दिवशी?

आजपासून ३५५ वर्षांपूर्वी याच दिवशी chhatrapati shivaji maharaj – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या मगरमिठीतून आपली सुटका करून घेतली होती.

जगाच्या इतिहासातील ही एक असामान्य घटना होती. औरंगजेब हा तत्कालिन जगातील सर्वांत मोठ्या, सर्वांत श्रीमंत, सर्वांत बलाढ्य अशा साम्राज्याचा सर्वेसर्वा होता.

तर chhatrapati shivaji maharaj – शिवाजी महाराज तेव्हा अद्याप छत्रपती व्हायचे होते. ते अजूनही पुण्याच्या लहानशा प्रांताचे जहागिरदार होते.

पण त्यांचा नावाचा डंका उभ्या हिंदूस्थानात गाजायला सुरूवात झाली होती.

हिंदूस्थानातील सारे राजे महाराजे औरंगजेबाला शरण जात असतांना किंवा त्याच्याशी लढून मरत असतांना,

दक्षिणेत chhatrapati shivaji maharaj – शिवाजी भोसले नावाच्या एका माणसाने औरंगजेबाचं हे मृत्युवादळ थोपवण्यासाठी दंड थोपटले होते.

सह्याद्रीच्या कड्यासारखीच त्याची बेलाग कणखर छाती होती. सह्याद्रीच्या पर्वत शिखरांसारखीच त्याची उंच स्वप्नं होती.

सारा हिदूंस्थान मुघलांच्या अंधारात हरवला जात असतांना दक्षिणेत शिवाजी राजांनी स्वातंत्र्याची मशाल पेटवली होती.

तिचा वणवा व्हायला वेळ लागला नाही. त्याची झळ औरंगजेबाला बसू लागली तशी त्यानं आपली संपूर्ण शक्ति महाराजांचं हे कोवळं स्वाभिमानी स्वप्न चिरडण्यासाठी वापरलं.

त्याला यशही लाभलं. मिर्झा जसवंतसिंह याने महाराजांना नामोहरम केलं. त्यांचा सपशेल पराभव केला.

आणि त्यांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठवून दिलं. तो आदेश होता. महाराजांना तो पाळावाच लागला.

औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ही भेट ठरली होती. महाराज त्यावेळी छत्तीस वर्षांचे होते. १३ मे १६६६ साली ही भेट घडली.

पण तिथे या शूर माणसाचा उचीत आदर करण्याची संधी औरंगजेबानं घेतली नाही. उलट त्यांचा अपमानच केला.

इतरांप्रमाणे हाही गप्प राहून आपल्यासमोर मान खाली घालून उभा राहिल ही त्याची समजूत मात्र chhatrapati shivaji maharaj – महाराजांनी उधळून लावली.

त्यांनी दरबारातच औरंगजेबाला आपल्या अपमानाचा जाब विचारला आणि निघून आले.

औरंगजेबानं महाराजांना बोलावलं होतं ते मूळात भेटीसाठी किंवा हवापाण्याच्या गोष्टी करण्यासाठी नाही.

त्याला त्यांचा काटाच काढायचा होता. महाराज रागावून दरबारातून निघून गेल्यानंतर त्याला आयतीच संधी मिळाली.

पण chhatrapati shivaji maharaj – शिवाजी राजांना एकदम काही करण्याचं धाडसही त्याला करवेना. कारण त्यामुळे दक्षिणेतील राजकारण धोक्यात येण्याचा संभव होता.

पण त्याला महाराजांचं काम तमाम करायचं होतं आणि महाराजांनाही ही गोष्ट नीट ध्यानात होती. त्यामुळे त्यांनी लागलीच हालचालींना सुरूवात केली.

औरंगजेबानं आपल्याला परत पाठवावं यासाठी त्यांनी विनंती अर्ज दाखल केले पण औरंगजेबानं त्याकडे दूर्लक्ष केलं.

महाराजांनी त्यानंतर आपल्या माणसांना तरी जाऊ द्यावं अशी विनंती केली. जी औरंगजेबानं मान्य केली.

पण त्यानंतर लगेच त्यानं महाराजांच्या निवासस्थानावर आपले पहारे बसवले आणि त्यांना अप्रत्यक्षपणे कैद केलं. महाराज हे पाहून हादरले असतील.

चिडेल संतापले असतील. रडलेही असतील. पण काही काळच.

त्यांच्यातला मूळ स्वाभिमानी सावध साहसी पुरुष लगेच जागा झाला असेल आणि त्यानं या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा विचारही सुरू केला असेल.

कारण कैदेत पडल्यानंतर महाराजांनी खचून न जाता हुशारीनं आपल्या चाली करायला सुरूवात केली. औरंगजेब आपल्याला मारणार पण लगेच नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

त्याचाच त्यांनी फायदा घेतला. औरंगजेबाच्या तावडीतून निसटण्यासाठी त्यांनी सामदामदंडभेद ही नीति सुरू केली.

आपण घाबरलो आहोत, अगतिक झालो आहोत अशी त्यानं आधी औरंगजेबाची समजूत व्हावी यासाठी विनंती अर्ज दाखल करणं सुरू केले.

आपल्या माणसांना त्यांनी आधी आग्र्यातून बाहेर काढण्याची हालचाल सुरू केली. त्यानंतर त्यांनी आपला बहुतेक खजिनाही स्वराज्यात पाठवून दिला.

औरंगजेबाच्या वतीने लढण्याच्या त्यांच्या अर्जांना औरंगजेबानं उत्तर दिलं नव्हतं. तो त्यांना अफगाणिस्तानात पाठवायची तयारी करत होता.

हे कळल्यावर महाराजांनी वेगळा पवित्रा घेतला. त्यांनी त्याचा बुद्धिभेद केला. महाराज अचानक आजारी पडले.

इतके की ते आता त्यांच्या राहत्या कक्षातूनही बाहेर पडेनासे झाले.

आपण किती आजारी आहोत याची सर्व माहिती तिखटमसाला लावून औरंगजेबाकडे पोहोचती होईल याची त्यांनी योग्य काळजी घेतली.

आजारपणाचं निमित्त करून त्यांनी आपली आणखी माणसं स्वराज्यात पाठवून दिली. दुसरीकडे दानधर्म करण्यास सुरूवात केली.

कैदेतून निसटायचंच हे त्यांनी ठरवंलंच होतं. याआधीही महाराजांनी जीवावर बेतणारी साहसं केली होती. धोखा घ्यायचा पण मोजून मापून.

सर्व बाजूंनी विचार करून. अगदी तपशिलवार योजना आखून. यावेळेही त्यांनी तेच केलं.

कैदेतून कसं निसटायचं याचा विचार केल्यानंतरच ते खोटे खोटे आजारी पडले असण्याची शक्यता जास्त आहे.

कोणी कोणी जायचं, कोणी राहायचं हाही विचार त्यांनी त्यानंतरच केला. गेलेल्या माणसांनाही त्यांनी कोणी काय करायचं याच्या योग्य त्या सूचना देऊनच पाठवलं होतं.

राहिलेल्या माणसांनाही त्यांनी कोणी काय करायचं याच्या सूचना देऊन ठेवल्या होत्या.

आपण आजारी आहोत आणि त्यांतून जीवंत राहण्याची शक्यता नाही ही खात्री त्यांनी औरंगजेबाला करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवला होता.

त्याचा यावर कदाचित विश्वासही बसला होता. औरंगजेबाला आपला हा शत्रू कसाही करून नष्ट व्हायला हवा होता.

त्यामुळेच त्यानं महाराजांच्या आजारपणावर विश्वास ठेवला असावा. पण याचा अर्थ तो पूर्ण गाफील होता असंही नव्हतं.

महाराजांना ठार करण्याचा तयारी त्यानंही चालवली होती. लवकरच महाराजांना दुसऱ्या जागेत हलवण्यात येणार होतं.

तिथून ते जीवंत बाहेर पडणार नव्हते हे त्याला आणि महाराजांनाही माहिती होतं. त्यामुळे त्याआधीच सुटण्याचा प्रयत्न करणं भाग होतं.

chhatrapati shivaji maharaj – महाराजांनी तो केला. महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले की आणखी कोण्या उपायाने हे निश्चित नाही.

पण ते योगायोगानं निसटले असं मात्र नक्कीच नाही. त्यांनी योजना आखून आपला हा बेत तडीस नेला होता.

त्यासाठी त्यांनी विविध उपाय केले असतील. एक चूक जरी झाली असती कोणाकडूनही तरी सारी योजना फसली असती.

पण chhatrapati shivaji maharaj – महाराजांची माणसे त्यांच्यासारखीच बिलंदर साहसी होती. त्यामुळे कोणीही आपलं नेमून दिलेलं काम करण्यास मागे पडले नाही.

१७ ऑगस्ट १६६६ ला महाराज आणि संभाजी राजे गुप्तपणे कैदेतून अखेर बाहेर पडले.

त्यानंतरही त्यांनी पुढे काय करायचं, कोणत्या मार्गाने स्वराज्यात यायचं याची आधीच आखणी केलेली असणार.

कारण ते मुघली मुलुखात होते आणि औरंगजेब त्यांना सहजासहजी जाऊ देणार नव्हता. महाराजांनी धक्कातंत्राचा वापर केला.

ते कैदेतून सुटतील किंवा सुटू शकतील ही शक्यताच कोणाच्या मनात आली नव्हती.

त्यामुळे अशा परिस्थिती उद्भवलीच तर त्याचा कसा सामना करायचा याची कोणतीच योजना औरंगजेबाकडे नव्हती.

नेमका याचाच महाराजांनी फायदा उठवला. त्यामुळे ते निसटले याचा सर्वांनाच प्रचंड धक्का बसला.

त्यांना जादूटोणा येतो, त्यामुळेच ते गायब झाले, अशा अफवाही नंतर उठल्या तेव्हा त्यामागेही महाराजांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगजेबाला त्यांनी पूर्णपणे गाफील अवस्थेत ठेवलं होतं. तो नंतर संतापला चिडला पण शिवाजी पुन्हा आपल्या हाती लागणार नाही याची त्यालाही खात्री झाली असावी.

त्यामुळेच त्यानं वरकरणी आपला हा संताप दाबून ठेवला. आपली झालेली फजिती त्यानं लपवून ठेवली.

स्वराज्यात chhatrapati shivaji maharaj – महाराज परतल्यावर त्यांनी हुशारीनं औरंगजेबाला खलिता पाठवून आपण तुमची भेट न घेताच परतलो

याची क्षमाही मागितली तेव्हा औरंगजेबानंही काहीच घडलं नसल्याचा आव आणत त्यांना माफ केलं.

महाराजांची हीच योजना नव्हे तर इतरही योजना जीवावरच्या होत्या. शाहिस्तेखानाचा पाडाव,

अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटका या सर्वांत त्यांनी बारकाईनं योजना आखल्या होत्या

आणि त्यांच्या मावळ्यांनी त्या बरहुकूम अंमलात आणल्या. म्हणूनच स्वराज्य उभं राहिलं.

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!