Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSFREEDOM EXPRESSINDIAMAHARASHTRA

Book – प्रस्तावना – मातीगारी

1 Mins read

Book – प्रस्तावना – मातीगारी

 

Book – ‘मातीगारी’ ही न्गुगी वा थ्योंगोची कादंबरी 1986 मधे केनियात गिकुयू भाषेत प्रसिद्ध झाली. 1982 ते 1986 दरम्यान केनियातल्या अनेक लेखक आणि बुध्द्धिजीविंना एकतर तुरुंगात डांबले होते किंवा ते घरदार , देश सोडून परागंदा झाले होते . विद्यार्थी आणि शिक्षकांमधला / प्राध्यापकांमधला संवाद सुद्धा हुकुमशहा डॅनिअल अरपचं सरकार मॉनिटर करण्याइतकी दडपशाही भयानक वाढली होती .

Book – ‘मातीगारी’ च्या प्रकाशानानंतर केनियात विचित्रच घडलं . या कादंबरीचा नायक ‘ मातीगारी मा न्जीरुंगी ‘ ( म्हणजे ज्याने बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलल्या आहेत असा देशभक्त ) देशाचे शत्रू असलेल्या एका गोऱ्या वसाहतवाद्याला आणि त्याचा हस्तक असलेल्या एका काळ्या केनियाईचा निष्पात करून आपल्या गावी परततो .
खोट्या स्वातंत्र्याचा दिखाऊपणा आणि वरवरचे भ्रामक बदल पाहून तो प्रचंड बेचैन होतो , अस्वस्थ होतो . स्वातंत्र्य मिळल्याचं ऐकून त्यानं आपली शस्त्रं कायमची म्यान केली होती. शांत , सुखी समाधानी आयुष्य घालवण्यासाठी तो आपल्या गावी परतलेला असतो . पण देशाची अवस्था पाहून तो झपाटल्यासारखा देशभर फिरू लागतो आणि भेटेल त्याला न्याय कुठे आहे , सत्य कुठे आहे असे सत्तेला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत सुटतो .

व्यंगात्मक ( विडंबनात्मक ) शैलीत लिहिलेल्या या नाट्यपूर्ण Book – कादंबरीत कादंबरीचा नायक मातीगारी देशातल्या विभिन्न वर्गाला राजकारण्यांना , विद्यार्थ्यांना , शिक्षकांना , पादऱ्यांना -देशातल्या विभिन्न वर्गाला प्रश्न विचारतो . तो बसमध्ये , रेल्वेत , हॉटेलात , चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी सत्य आणि न्याय शोधतो , शोधताना प्रश्न विचारतो –
माझा प्रश्न आहे –

गवंडी घर बनवतो
आणि जो कडेला उभा राहून घर बनताना पाहतो
तोच शेवटी त्या घराचा मालक होतो .
गवंडी उघड्या आकाशाखाली झोपतो
त्याला स्वत:चं घर नाही .

शिंपी कपडे शिवतो .
पण ज्याला सुईत दोरा सुद्धा ओवता येत नाही
तो कपडे घालून मिरवतो.
शिप्याच्या अंगावर चिंध्याच असतात .
शेत नांगरणारा शेतात पीक उगवतो
आणि जो पिकाचे भारे उचलतो , पेरणी कधीच करत नाही
तो भरपूर खाऊन जांभया देत बसतो .
श्रमजीवी उत्पादन करतात,
परदेशी आणि परजीवी ते गडप करतात , हडप करतात
आणि मजूर हातावर हात चोळत बसतो .
कुठे आहे सत्य आणि न्याय या धरतीवर ?

या Book –  कादंबरीचे तीन भाग पडतात . त्या अनामिक देशाच्या ‘ व्हॉईस ऑफ ट्रूथ ‘ या रेडियो स्टेशनवरुन मधे मधे बातम्या प्रसारित होत असतात . या बातम्यांमधून सरकारी धोरणांची भलावण होत असते. देशाच्या विकासाला आडकाठी आणणाऱ्या शक्ती उफाळून आल्या आहेत. मातीगारी एक देशभक्त आहे. त्याच्या आयुष्यातला बराच काळ त्यानं जंगलात वसाहतवाद्यांशी लढण्यात घालवलाय . स्वातंत्र्याची बातमी ऐकून तो परत आला आहे.आपली एके -47 रायफल आणि इतर शस्त्रं त्यानं एका झाडाखाली पुरून ठेवली आहेत आणि त्यानं आता कमरेला शांततेचा पट्टा बांधला आहे. तो निश्चय करतो की समोर असलेले प्रश्न तो शांततापूर्ण पद्धतीनं निशस्त्र राहूनच सोडवेल . देशाची अवस्था पाहून तो बेचैन झालं आहे. देशातली सगळी संपदा अद्यापही विदेशी मालकांच्या ताब्यात आहे. या विदेशी मालकांची मदत करण्यासाठी काळ्या कातडीचे काही देशी दलाल निर्माण झाले आहेत , ते प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहेत . लोक सत्तेच्या दहशतीनं ग्रस्त आहेत . मातीगारीला सगळीकडे अन्याय दिसतोय. तो सत्य आणि न्यायाच्या शोधात भटकतोय. त्यांच्या या सत्य आणि न्यायाच्या शोधाच्या दरम्यान अनेक घटना घडतात . या शोधातून तो निष्कर्षाला पोहचतो की ,” संघटित सशस्त्र शक्तिच पीडितांना न्याय देऊ शकते ‘

Book – कादंबरीच्या तिसऱ्या भागात त्याचा हा झालेला मोहभंग एक विस्फोटक रूप धारण करतो. एका प्राध्यापकाशी झालेल्या चर्चेत तो म्हणतो – ‘ ज्या देशात भय असतं तो देश दु:खाचं घर होतो . पापात्म्याला शांत करायला जर कुणा निरपराध्याचा बळी दिला तर तो बळी गिळूनही पापात्मा शांत होत नाही उलट त्यांची भूक आणि वखवख वाढतच जाते.. !’

‘ईश्वर आहे तर अन्याय का आहे ?’ मातीगारीच्या या आणि अश्या प्रश्नावर चर्चच्या पादऱ्याकडे उत्तर नसतं . कादंबरीच्या शेवटच्या भागात तो ठरवतो की , ‘ दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी आता कमरेला बांधलेला शांततेचा पट्टा सोडून बंदूकीच्या गोळ्यांचा पट्टा बांधायला हवा आणि जंगलाकडे पुन्हा प्रयाण करायला हवं .’ तो आपल्या सहकाऱ्यांना – मुरिउकी आणि गुथेराला सांगतो , ‘आपल्या कष्टांवर जगणारे आपल्याला कधीच रोखू शकणार नाहीत भले ते आपल्याला पकडू देत , तुरुंगात घालू देत किंवा मारून टाकू देत. उत्पादन करणाऱ्यांच्यात , निर्माण करणाऱ्यांच्यात आणि परजीवी , परभक्षींच्यात कधीही सामंजस्य , सहकार्य किंवा शांततामय सहजीवन निर्माण होऊ शकत नाही – कधीच नाही . काल पर्यन्त मला वाटायचं , माझी खात्री होती की शांततेचा मी कंबरपट्टा बांधलाय त्यामुळे या देशात सत्य आणि न्याय मिळायला मला अडचण येणार नाही . कारण सत्य आणि न्यायामधे कुठल्याही सशस्त्र शक्तीपेक्षा जास्त ताकद असते तसंच चर्चा आणि शांततापूर्ण व्यवहार यामुळे शत्रुत्व नष्ट होतं . पण पहा या असल्या विचारांमुळे माझी अवस्था काय झालीय . आधी तुरुंगात , नंतर वेड्यांच्या इस्पितळात ! तुम्ही दोघं नसता तर मी कुठे असतो ? तिथेच – तुरुंगात आणि वेड्यांच्या इस्पितळात ! काल मी एक धडा शिकलोय . फक्त शब्दांनी शत्रूचा पराभव करता येत नाही . तुमचा युक्तिवाद किती नेमका आहे , योग्य आहे याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसतं . त्याचबरोबर फक्त शस्त्रांमुळे त्याला पळवून लावता येणार नाही . पण शस्त्रांसोबत तुमच्या कडे सत्य आणि न्यायपूर्ण विचार असतील तर शत्रूला पराजित करता येतच . जर न्याय आणि ताकद एकत्र असतील तर तुमचा शत्रू समोर उभा राहाणारच नाही. पशूंच्या झुंडीत , चोर
, डाकू आणि खुन्यांच्या बाजारात पीडितांना फक्त सशस्त्र एकतेमुळेच न्याय मिळू शकतो. ‘
भ्रष्ट सरकारला उखडून , फेकून देण्यासाठी आपल्या या कादंबरीत सशस्त्र संघर्षावर जोर दिला आहे. चर्चच्या पादरीशी झालेल्या संभाषणातून धर्म आणि न्याय अन्याय यांचे वेगवेगळे पैलू समोर येतात.
न्गुगीची ‘मातीगारी’ केनियात खूप लोकप्रिय झाली . ज्या कुणी ही Book – कादंबरी वाचली ते , हिची चर्चा करू लागले आणि Book – कादंबरीत मातीगारीनं विचारलेले प्रश्न विचारू लागले . हा प्रकार इतका वाढला की मातीगारी कादंबरीतलं एक पात्र नं राहता मातीगारी खरोखर अस्तित्वात आहे असं लोकांना वाटू लागलं . तिथल्या राष्ट्रपती अरप मोईच्या अधीन असलेल्या गृहमंत्रालयानं मातीगारीच्या अटकेचा आदेश काढला . ‘मातीगारी हे कादंबरीतलं पात्र आहे खरा खुरा – जिवंत माणूस नाही .’ हे पोलिसांना समजलं आणि पोलिसांचा संताप आणखीनच वाढला. परिणामी फेब्रुवारी 1987 मधे पोलिसांनी ‘मातीगारी च्या प्रती फक्त दुकानातूनच नव्हे तर लोकांच्या घराघरात छापे मारून जप्त करून जाळल्या . Book – कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केनियाबाहेर पोहचला होता , तो खूप प्रसिद्ध झाला .

एखाद्या नववसाहतवाद्याला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीची काय अवस्था होते याच उत्तम उदहण म्हणजे ही कादंबरी आहे. याआधीही 1977 मधे न्गुगीला एक नाटक लिहिल्यामुळे तुरुंगात जावं लागलं होतं आणि सरकारी दडपशाहीचा सामना करावा लागला होतं. या नाटकाचासुद्धा ‘ आय विल मॅरी व्हेन आय वॉन्ट ‘ नावानं अनुवाद झाला. याच काळात न्गुगीची ‘ पेटल्स ऑफ ब्लड ‘ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित झाली . या कादंबरीत केनियातल्या नव्या शासकांवर तीव्र टीका होती. डॅनिअल अरप तेंव्हा केनियाचा संरक्षण मंत्री आणि जोमो केन्याटा राष्ट्रपती होता. जोमो केन्याटा ची छबी आधी एक झुंजार राष्ट्रवादी नेत्याची होती पण सत्ता मिळाल्यावर जोमो केन्याटाचं वागणं कसं बदललं याची न्यूगी वा थ्योंगोची अटक हे फक्त एकंच उदाहरण नाही तर अनेक बेसुमार वेदनादाई कारवाया हे सार्वत्रिक वास्तव होतं .
‘मातीगारी’ कादंबरीनं केनियातल्या जनतेला जागरूक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली . Book – कादंबरीतल्या एखाद्या पात्राला एखाद्या देशातले सत्ताधीश इतके घाबरावेत की त्यांच्या अटकेचं वॉरंट निघावं याच्या इतकी महत्वाची भूमिका कोणती असू शकते ?

— आनंद स्वरूप वर्मा

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!