POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Bidanur chennamma – बिदनूरच्या राणी चेन्नम्मा

1 Mins read
  • Bidanur chennamma - बिदनूरच्या राणी चेन्नम्मा

बिदनूरच्या राणी चेन्नम्मा 
(मराठा साम्राज्याला मदत करणारी)

केलाडी साम्राज्याची राणी_चेन्नमा

महाराणी ताराराणी आपल्या सर्वांना माहितच आहे, त्यांचा पराक्रम आपण अनेकदा इतिहासात ऐकला आहे ,वाचला आहे कर्नाटकातही शूर आणि पराक्रमी राणी चेन्नम्मा भारतीय इतिहासात होऊन गेली आहे, या राणीने खुद्द मुघलबादशाहा औरंगजेब याला सुद्धा नाकीनऊ आणले होते.

Bidanur chennamma राणी चेन्नमा सुरुवातीच्या काळात तिच्या सुसंस्कृत व चांगुलपणामुळे
ओळखली जात असे. परंतु या स्त्रीने इतिहास बदलला आणि स्त्रियांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. भारतीय इतिहासातील शूर व लढवय्या स्त्रियांमध्ये तिला मानाचे स्थान दिले जाते.

आपल्या राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा तिने धैर्याने सामना केला आणि प्रजेची रक्षणकर्ती राणी म्हणून Bidanur chennamma राणी चेन्नमा पुढे नावारूपाला आली.

Bidanur chennamma राणी चेन्नामाने कर्नाटकाच्या किनारपट्टीवर वसलेल्या ‘केलाडी’ या छोट्याश्या प्रांतावर २५ वर्ष (१६७१ ते १६९६) राज्य केले. तिच्या पती निधनानंतर तिने राज्यकारभाराची सुत्रे आपल्या हाती घेतली.

प्रजेच्याही मनात तिच्याबद्दल आदर होता. त्यांच्या प्रत्येक सुख दु:खात ती जातीने लक्ष घालीत असे. शरणागती पत्करणे हे तिच्या रक्तातच नव्हते जणू! आपल्या राणीचा हाच खंबीरपणा पाहून सैन्य देखील अगदी जीवाची बाजी लावून लढत असत.

Bidanur chennamma चेन्नमा राणी एक धार्मिक वृत्तीची स्त्री आणि तिच्या काळातील व्यावहारिक प्रशासक म्हणून ओळखली जात होती. कर्नाटक राज्यामध्ये आजही

लोक तिची आठवण काढतात.राणी चेन्नम्मा यांनी आपल्या मराठी शाहिच्या स्वराज्य कार्यात खुप मोलाची मदत केली आहे.हा इतिहास बहुतेक कोणाला ज्ञात नाही.या चेन्नम्मा राणीच्या मोलाच्या मदतीमुळे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज जिंजीला सुखरूप पोहचले .एक स्री असून या राणीने औरंगजेबाला न घाबरता छत्रपती राजाराम महाराजांना आपल्या राज्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून दिला.तुंगभद्रेच्या तीरावर शिमोग्यास पोहोचण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांना बेदनुरच्या राज्यातून प्रवास करावा लागणार होता.संताजी जगताप व रूपाजी भोसले यांच्यासह मोगली सैन्याबरोबर अगोदरच चकमक झाली होती.छत्रपती राजाराम महाराजांना हा प्रवास गुप्तपणे करावयाचा होता.कारण मुगल सैन्य त्यांच्या पाठलागावर होते.

छत्रपती राजाराम महाराज जिंजीला निघाले.
त्यावेळेला तुंगभद्रेच्या तीरावर शिमोगाला पोहचण्यापूर्वी राजाराम महाराजांना बेदनुरच्या राज्यातून प्रवास करावा लागला. यावेळी बेदनुरच्या राज्यावर राणी चन्नम्मा राज्य करत होती. हिंदू धर्म व संस्कृती यांना ईस्लामी आक्रमणा पासून वाचवण्याचे शिवछत्रपतींचे दक्षिणेतील कार्य तिला माहित होते. मराठ्यांनी मोगलांशी चालवलेल्या संघर्षाबद्दल तिला सहानुभूती होती. आणि म्हणूनच तिच्या राज्यातून छत्रपतीा राजाराम महाराजांना सुखरूप पणे जाऊ देण्याचे आव्हान तिला करताच तिने त्यांना आनंदाने सर्व प्रकारचे सहकार्य देऊ केले. संकटग्रस्त मराठी राज्यास मदत करणे हा आपला राजधर्म आहे असे तिने मानले .मराठे जे करीत आहेत ते दक्षिणेतील समस्त हिंदूंचे कार्य आहे अशी तिची भावना होती. या भावनेमुळे औरंगजेब बादशहाच्या संभाव्य क्रोधाची भीती न बाळगता छत्रपती राजाराम महाराजांच्या आपल्या राज्यातील प्रवासाची चोख व्यवस्था तिने केली. तिच्या सहाय्याने छत्रपती राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह शिमोग्यास सुखरूप पोहोचले.

दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांचा पाठलाग करणाऱ्या मुगली सैन्यास बिदनूरच्या राज्यात शिरल्यावर समजुन चुकले कि Bidanur chennamma चेन्नम्मा राणींने छत्रपती राजाराम महाराजांना सहाय्य केले आहे.औरंगजेबाने मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात देण्याविषयी राणीला तंबी दिली .त्यांना चेन्नम्मा राणीने तात्काळ जबाब दिला की,राजाराम आमच्या राज्यात आला होता हे खरे ,पण तो आमचा प्रदेश सोडून गेला आहे. जाताना मागे आपले काही कपडे व दागिने ते ठेवून गेले आहेत. ते आमच्या हाती पडले असून आम्ही ते तुमच्याकडे पाठवून देत आहोत.

राजाराम महाराज बिदनूरच्या राज्यात शिरताच जणू काही आपण त्यांचा पाठलाग केला आहे अशा थाटात Bidanur chennamma चेन्नम्माने बतावणी केली तरी त्यामुळे मोगल फसले नाहीत. त्यांनी Bidanur chennamma चेन्नम्मा राणीने छत्रपती राजाराम महाराजांना केलेल्या सहाय्याची बातमी बादशहाकडे त्वरेने कळवली. तेव्हा औरंगजेबाने क्रुद्ध होऊन राणीवर भली मोठी फौज शिक्षा करण्यास पाठवली. पुढे या फौजेचा समाचार संताजी घोरपडे यांनी घेतला. आणि राणी वरील मोगली मोहिम उधळून लावली. तेव्हा चंन्नमा राणी कडून दंड म्हणून काहीतरी रक्कम घेऊन मोगलांनी हे प्रकरण मिटवले.
राणी चेन्नम्मा म्हणजे इतिहासातील न उलगडलेले पान .

 

 

“अशा या शूर व धाडसी राणीला आमचा मानाचा मुजरा “

 

 

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

×
BLOGSHISTORYINDIA

Vijayaraje Shinde - श्रीमंत विजयाराजे शिंदे

error: Content is protected !!