Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

Bhaskar Ramchandra Tambe – कविवर्य भा.रा.तांबे

1 Mins read
  • कविवर्य भा.रा.तांबे

Bhaskar Ramchandra Tambe – कविवर्य भा.रा.तांबे

 

 

डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका !! (संपूर्ण गाणे खाली दिले आहे)

असे सुंदर भावगीत लिहिणारे स्वर्गीय कविवर्य Bhaskar Ramchandra Tambe – भा.रा.तांबे यांची आज जयंती २७ ऑक्टोबर १८७३.(निधन ७ डिसेम्बर १९४१)
हिंदी भाषिक प्रदेशात जन्म घेऊन व त्याच भागात जीवन घालविलेल्या या कवीश्रेष्ठाची मराठी प्रतिभा अदभूत होती.
त्यांनी २२५ चे वर कविता लिहिल्या. त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळ मुगावली येथे झाला तर शिक्षण अलाहाबाद व आग्रा येथे झाले महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही त्यांनी २२५ चेवर कविता लिहिल्या मराठीची केलेलि सेवा उल्लेखनीय आहे. 

Bhaskar Ramchandra Tambe – त्यांची लोकप्रिय अजरामर गाणी ”’
नव वधु प्रिया मी बावरते — मधु मागसी माझ्या सख्या –तुज्या गळा माझ्या गळा — डोळे हे जुलमी गडे – कला ज्या लागल्या जीवा -जन पळभर म्हणतील हाय हाय -मावळत्य दिनकरा–रे हिंद बांधावा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी –
कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या कविता ७५ कविता संपादित केल्या तर डॉ माधवराव पटवर्धनानी Bhaskar Ramchandra Tambe – “तांबे यांची समग्र कविता” हे १ ९ ३ ५ मध्ये प्रकाशित केले.मी ८वीत असताना भावनगरयेथे असलेल्या आत्याकडे गेलो होतो .तेथे आत्याच्या ओळखीचे डॉ. तांबे( डॉ. र भा.तांबे ) नावाचे गृहस्थ होते त्यांचे घरी १९६२ साली जाणेचा योग आला होता त्यावेळी तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा ?या प्रश्नावर “माझे वडील होते” असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता .

!!अभिवादन !!

Bhaskar Ramchandra Tambe – त्यांची गाजलेली गीतें
नववधू प्रिया मी ——तुझ्या गळां माझ्या गळां —–मधु मागशि माझ्या —-मावळत्या दिनकरा ——या बालांनो या रे या हिंदबांधवा थांब——-अजुनि लागलेंचि दार —– कशी काळनागिणी—— कळा ज्या लागल्या जीवा Kala —–कुणि कोडें माझें उकलिल —-घट तिचा रिकामा G—-घन तमीं शुक्र बघ—– चरणिं तुझिया मज देईं —–जन पळभर म्हणतिल —– डोळे हे जुलमि गडे —–तिनिसांजा सखे मिळाल्या ——–तें दूध तुझ्या त्या — —— निजल्या तान्ह्यावरी माउली —– पिवळे तांबुस ऊन कोवळे —– भाग्य उजळलें तुझे —-

तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका—————–।।धृ ।।
घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका
खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी
येतील त्या संधी बघूनी, आग उगा लावू नका
डोळे हे जुल्मी गडे …..—————।।१।| भा ऱा . तांबे
गोड स्मित ओठा वरती ,धड धडते अधर किती
सांगू कुणा व्यथा हृदयी , नसे तुम्हा काय भीती ?
पदर अधरी निसटताना, सावरू किती पुन्हा पुन्हा
गोड तनी शिरी शिरवे , आता स्वप्नी येऊ नका
डोळे हे जुल्मी गडे—————–।।२।।

शिळ शूल सदा स्मरते, ऐकून तरी मनी दचकते
कुणी कधी पाहिलं जरी , हे सगळे ना वळते
मन नाही थार्या वरी , कळवळते सांगू उरी
धाक मज चहु कडूनि , चोरून असे भेटू नका
डोळे हे जुल्मी गडे————————।।३।।
जरी मनी असले भलते , नकोच उगीच काय तरी हे ?
वडील धारी आप्त असती , कुणी तरी पाहिल बरे !!
जमले सूत्र तुमचेशी तर , गुण मिलन करू नका
चुकून चूक तसली घडली , वेळ तशी आणू नका
डोळे हे जुल्मी गडे———————।।४।।”

“ताई, आणखि कोणाला ?”
“चल रे दादा चहाटळा !”
“तुज कंठी, मज अंगठी !”
“आणखि गोफ कोणाला ?”
“वेड लागलें दादाला !”
“मला कुणाचें ? ताईला !”
“तुज पगडी, मज चिरडी !”
“आणखि शेला कोणाला ?”
“दादा, सांगूं बाबांला ?”
“सांग तिकडच्या स्वारीला !”
“खुसूं खुसूं, गालिं हसूं”
“वरवर अपुले रुसूं रुसूं”
“चल निघ, येथे नको बसूं”
“घर तर माझें तसू तसू.”
“कशी कशी, आज अशी”
“गम्‍मत ताईची खाशी !”
“अता कट्टी फू दादाशीं”
“तर मग गट्टी कोणाशीं ?

 माधव विद्वांस 

Leave a Reply

error: Content is protected !!