Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

lonar lake distance from pune – आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

1 Mins read

lonar lake distance from pune – आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

 

 

lonar lake distance from pune – माधव विद्वांस

23/5/2021,


प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे याची निर्मिती एक उल्केमुळे झाली.उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर असून .

१८२३ मध्ये अलेक्झांडर या ब्रिटीश माणसाने हे जगासमोर आणले . अर्थात स्कंद पुरण,तसेच ऐन -ए -अकबरी यामध्ये त्याचा उल्लेख आहे .

हे विवर साधारण ५० हजार वर्षा पूर्वी उल्कापाता मुळे अस्तित्वात आले .

जगातील ५ व्या क्रमांकाचे हे विवर आहे . परदेशातून पर्यटक येथे येतात, पण  शेगावला जाणारे भाविक इकडे फिरकत नाहीत

हि खेदाची गोष्ट आहे. औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. lonar lake distance from pune शेगाव पासून १०० KM वर आहे


अकोला येथूनही हे २ तासात येथे जाता येते . शेगाव ,सिंदखेड राजा (जिजाउंचे जन्मस्थान) मेहेकर बालाजी मंदिर,

तसेच १०५ फुट उंचीचा नांदूर येथील मारुती हे एका दिवसाच्या ट्रीप मध्ये होइल. या सरोवराचे काठावर जाई पर्यंत हे दिसत नाही

साधारण १.५ KM व्यास व ४५० फुट खोल असे हे सरोवर असून खुरट्या जंगलाने हे वेढलेले आहे. MTDC चे येथे यात्री निवास आहे .

प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे

वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात.

हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी

या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे.


इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. या परिसरात

अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. विष्णू मंदिर खजुराहो शैलीतील मंदिर आहे .

तेथील मारुती मंदिरातील मारुती उल्केचा तुकडा असावा असे म्हणतात. तेथे होकायंत्र चालत नाही अर्थात मी तेथे गेलो त्यावेळी

माझ्याकडे होकायंत्र नव्हते त्यामुळे मला सत्यता पडताळता आली नाही तुम्ही गेलात तर पहा व कळवा .

प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

प्रत्येक भारतीयाने आवर्जून पहावे असे लोणार सरोवर

पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास

व या lonar lake distance from pune परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर

यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो.

प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. माझे आजे सासरे

सातारचे कै. भडजीपैलवान भिडे गुरुजी (तालीम मास्तर ) यांचे आत्म चरित्रात लोणारला भेट दिल्याचा उल्लेख आहे .


संकलन

माधव विद्वांस

error: Content is protected !!