Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Babasaheb purandare – पुरंदरेंची विष्ठा का चवदार लागते ?

1 Mins read

Babasaheb Purandare – पुरंदरेंची विष्ठा का चवदार लागते ?

 

 

Babasaheb Purandare – पुरंदरेंची विष्ठा का चवदार लागते ?

दत्तकुमार खंडागळे

 

 

 


728x90 Romantic Collection

 

19/8/2021,

महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे, पुरंदरे आणि संभाजी ब्रिगेड असे वादंग सुरू आहे. पुरंदरे हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. महाराष्ट्रातला सदाशिवपेठी वर्ग

आणि त्यांच्याकडे मेंदू गहाण ठेवलेला वर्ग नेहमीच पुरंदरेंचा उदोउदो करत आला आहे. त्यांना पुरंदरे हे महान आत्मा, महापुरूष वाटतात. असे वाटणारे सर्व लोक

यथाशक्ती पुरंदरेंचे स्तोम वाढवत असतात. पुरंदरेंनी “छत्रपती शिवरायांचा इतिहास घरोघर पोहोचवला !” असे या वर्गाचे नेहमीच म्हणणे असते. त्यासाठी ही सर्व

मंडळी पुरंदरेंच्यावर स्तुतीसुमनंं ढाळत असतात. त्यांच्या कौड-कौतुकाचे गाण गात असतात. हा संबंध वर्ग आप-आपली माणसं कशी मोठी व महान आहेत हे

सातत्याने बोलत असतो, मांडत असतो. मग ती माणसं साहित्यातली, कला क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली किंवा राजकीय क्षेत्रातली असोत. त्यांचे असलेले नसलेले

मोठेपण नेहमीच ही मंडळी मांडत राहते. माध्यमातही ब-यापैकी हिच मंडळी चालक-मालक, संपादक आहे. त्यामुळे वरणावरती तुंपाची धार जरा जास्तच असते. असो.

शंभर वर्षाचा झाला, कुणी म्हणाले पुरंदरेंसारखा महापुरूष पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले” अशा प्रकारे अनेकांनी पुरंदरे नावाच्या कुंडात डूबक्या मारून

गंगास्नानाचा आनंद लुटला. हे होणारच होते. कारण आपला माणूस मोठा आहे. जो मोठा आहे तो आपलाच आहे आणि आपलीच माणसं मोठी असतात असं ब-यापैकी

या लोकांना वाटत राहते. मग ती माणसं मोठी नसली तरी ही मंडळी आपल्या माणसांविषयी बोलून, लिहून त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न करतात. पुरंदरेंच्या

शंभरीच्या सोहळ्यानिमित्त हेच घडले.


728x90 Romantic Collection

मुळात बळवंत पुरंदरे Babasaheb Purandare यांनी शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या नावावर डल्ला मारला. पुरंदरेंचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. मग त्यांना

बाबासाहेब ही पदवी कोणी व कधी दिली ? पुरंदरेंनी कधीच पोवाडा गायला नाही, कधीच हातात डफ धरला नाही. मग हे शाहीर म्हणून कसे प्रस्थापित झाले ?

ग्रामिण महाराष्ट्रात शिवशाहीर म्हणून प्रसिध्द असणा-या शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या नावातले “शिवशाहीर बाबासाहेब” हे दोन शब्द पुरंदरेंनी उचलले

आणि यांची इतिहासाच्या प्रांगणात मुशाफिरी सुरू झाली. त्यांनी देशमुखांची ही दोन नावं ढापून स्वत:चे बस्तान बसवून घेतले. “पुरंदरेंनी इतिहास लिहीला,

शिवाजी महाराजांना त्यांनी घराघरात पोहोचवले, त्यांच्यामुळेच आम्हाला शिवाजी महाराज कळले !” असे म्हणणारी मंडळी एकतर कावेबाज, धुर्त किंवा बेअक्कल

असते. पुरंदरेंच्यामुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचले असे म्हणणे हा छत्रपती शिवरायांचा मोठा अवमान आहे. पुरंदरेंनी इतिहास लिहीला पण तो विकृत व

जाणिवपुर्वक स्वजातीय स्तोम वाढविणारा लिहीला. पुरंदरेंच्या इतिहासात गणिमी कावा मांडला आहे पण तो ब्राम्हणी काव्याने मांडला आहे. त्यांनी त्यांच्या


728x90 Romantic Collection

शेलारखिंड या पुस्तकात तर शिवरायांना जोक्त्याची उपमा दिली आहे. अतिशय हूशारीने हे शब्द त्यांनी शत्रूच्या तोंडी घातले आहेत. त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात

अशी अनेक पाचरं मारून ठेवलेली आहेत. जे लोक पुरंदरेंच्या भक्तीचा, श्रध्देचा बेलभंडार भाळी लावून ते वाचतात त्यांना ते जाणवत नाही. पण जे लोक डोळे उघडे

ठेवून विवेक जागा ठेवून वाचतात त्यांना ते लक्षात येते. बाकी जो अजेंडाधारी समुदाय असतो त्याला हेच हवे असते. त्याच्यासाठी हेच भांडवल असते.

पुरंदरेंनी Babasaheb Purandare लिहीलेल्या इतिहासाला जानव्याचा तिढा आहे. त्यांच्या या मांडणीमुळे महाराष्ट्रात अनेकदा दंगली घडल्या आणि दंगेखोर प्रवृत्ती वाढल्या.

पुरंदरेंच्या इतिहास लेखनाला दंगलीचे भांडवल म्हणून अनेकांनी वापरले. कोरेगाव-भीमाच्या दंगलीतली असतील किंवा मिरजेच्या दंगलीतली असतील ही सर्व

दंगलखोर भुतांनी याच इतिहास मांडणीचा फायदा उठवलाय. खरेतर पुरंदरेंचा या मांडणीमागचा हेतूच तो असावा ? अशी शंका येते. राज ठाकरे

पुरूषोत्तम खेडेकरांना दंगेखोर म्हणत आहेत पण पुरंदरेंनी या दंग्याची बारूद इतिहासाच्या चोपडीत भरून ठेवली आहे हे ते सोईस्करपणे सांगत नाहीत.

कारण ही मांडणी त्यांना सोईची वाटते आहे. प्रविण गायकवाडांना पुण्यात फिरू देणार नाही म्हणणारे राज ठाकरे जेम्स लेनच्या पिलावळींना असे आव्हान

द्यायला पुढे कधी आले नव्हते. तेव्हा श्रीकांत बहूलकरांचे समर्थन करायला राज ठाकरे पुढे होते. आज जर प्रबोधनकार ठाकरे असते तर त्यांनी पुरंदरेच्या

शंभरीतही त्यांच्या इतिहास लेखनातील घाणीची चिरफाड केली असती. पुरंदरेच्या पांढ-या दाढीचे केस कोंदडाच्या टणत्काराने भादरून टाकले असते.

प्रबोधनकारांनी पुरंदरेंचे Babasaheb Purandare समर्थन करणा-या राज ठाकरेंच्याही कानफटात लावल्या असत्या. टिळक वगैरे मंडळींना चोपून

काढणा-या प्रबोधनकारांनी पुरंदरेंचे फाजिल लाड कधीच केले नसते. पुरंदरेंनी लिहीलेल्या इतिहासात संघाच्या अजेंड्याची पेरणी जाणिवपुर्वक केलेली आहे.


728x90 Romantic Collection

एखाद्याने हंडा भरून पाणी द्यावे पण जाता जाता त्यात विषाचे काही थेंब टाकून पाणी विषारी करावे असा प्रकार पुरंदरेंनी केला आहे. हंडाभर पाणी दिल्याचा

कालवाच इतका मोठ्ठा करायचा की त्यात विष कालवलेले कुणाच्या लक्षात येवू नये. त्यासाठी “आम्ही पाणी दिले, आम्ही पाणी दिले !” अशा हाकाट्या पिटायच्या.

त्यामुळे लोक विष कालवलेले विसरून पाणी दिलेले तेवढे लक्षात ठेवतील हे मानसशास्त्र अजेंडाधारी जाणून आहेत. पुरंदरेंनी इतिहास लिहीला,

त्यांनी शिवाजी राजांना घरोघरी पोहोचवले असे सतत सांगण्यामागे हेच कारण आहे. पुरंदरेंच्याआधी या देशात इतिहासकार जन्माला आलेत. त्यांनी

अतिशय चांगला इतिहास लिहीला आहे. त्यांनी तो ‘इतिहास’ इतिहासकार म्हणून तटस्थपणे मांडला आहे. पण पुरंदरेंनी याच इतिहासाच्या हंड्यात विष

कालवून तो विषाक्त केलाय. त्यांचा हाच पराक्रम त्यांच्यासारख्या कावेबाज लोकांना खुप मोठा वाटतो. ज्यांच्या मेंदूला जाणव्याचे तिढे आहेत किंवा तो

अजेंडा ज्यांच्या डोक्यात आहे अशा तमाम लोकांना पुरंदरेंनी इतिहासाच्या नावाने केलेली विष्ठा चवदार वाटते. अशी मंडळी पुरंदरेच्या इतिहासाच्या मांडणीने

सुखावतात. ते चवीने मिटक्या मारत पुरंदरेंचा इतिहास खातात.

 

 

 


728x90 Romantic Collection

Leave a Reply

error: Content is protected !!