Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

azad hind sena – नेताजी सुभाषचंद्र बोस

1 Mins read

azad hind sena – आझाद हिंद अधिपती नेताजी सुभाषचंद्र बोस

 

azad hind sena – आझाद हिंद अधिपती

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिनांक २३ जानेवारी १८९७ या दिवशी कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ

बोस हे एक नामवंत वकील होते. हे वृत्तीने, प्रज्ञेने आणि विचाराने स्वतंत्र होते. इंग्रजांची अरेरावी असह्य झाल्यामुळे

त्यांनी सरकारी वकिलाची जागा सोडून दिली होती.’ रायबहाद्दर ‘ हा किताब अभिमानपूर्वक अव्हेरला होता.

आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यावर अढळ विश्वास असणाऱ्या या कायदेपंडिताला कोणाच्या ओंजळीने

 

पाणी पिणे कधीच रुचले नाही. हाच स्वाभिमान सुभाषबाबूंच्या जीवनात आणि वर्तमानात सदैव आढळून आला.

दि.२१आॅक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे सुभाषचंद्रानी azad hind sena ‘आझाद हिंद सरकारची ‘ स्थापना केली.

सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जात.

दुसरे महायुद्ध सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा, हा आज भारताचा

राष्ट्रीय नारा बनला आहे.

आझाद हिंद सेना azad hind sena ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना म्हणून प्रसिद्ध होती.

याची स्थापना सुभाषचंद्र बोसनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात केली. दिनांक २५ आॅक्टोबर १९२४ या दिवशी

सुभाषचंद्र यांना कैद करण्यात आले. सुरुवातीस अलीपूर , बेहरामपूर ,कलकत्ता येथील कारागृहात सुभाषबाबूंना

ठेवून नंतर त्यांची रवानगी मंडाले येथे करण्यात आली. मंडाले येथे असताना बॅरिस्टर देशबंधू चित्तरंजन दास यांच्या

निधनाचे वर्तमान सुभाष चंद्र यांना कळले, आणि त्यांचे चित्त विदीर्ण झाले .जीवनात आपदांचे पर्वत लीलया पेलणारा

हा महापुरुष गुरूच्या निधनाने पुरता खचला. १९२८ मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या सहकार्याने ‘इंडिया इंडिपेंडन्स

यूथ लीग’ ची स्थापना केली.१९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सुभाषचंद्र यांना पुन्हा अटक करण्यात आली.

गांधी आयर्विन करारानंतर अनेक देशभक्ता बरोबर सुभाषबाबू बंद मुक्त झाले सन. १९३१ मध्ये गांधी-आयर्विन

करारानंतर भगतसिंगांची फाशी रद्द होईल असे सर्वांना वाटत होते. पण या संदर्भात सुभाष चंद्र यांची घोर निराशा झाली.

भगतसिंग फाशी गेले.१९३२ हे वर्ष उजाडले आणि सुभाषबाबूंसाठी कारागृहाचे दार पुन्हा उघडले गेले. आयुष्यात

११ वेळा कारावास भोगणारे सुभाषचंद्र हे तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते, भूमिपुत्र होते.

 

सुभाषचंद्र बोस यांची वारंवार बिघडणारी प्रकृती व अविरत घडणारी धडपड पाहून त्यांच्यावर हद्दपारीची नोटीस

बजावण्यात आली .’उपचारासाठी युरोपात जाऊन राहणार असाल तर तुम्हाला कारागृहात ठेवणार नाही’.

सुभाषचंद्रांनी ही अट नाकारली. पण परदेशी जाण्याचे ठरवले. आपल्या देशाबाहेर पडुन साडेतीन वर्षे उलटुन

गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार ओढ होती, पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता

तो शत्रूचा नि:पात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननिय

नागरिक म्हणुन. गेली साडेतीन वर्षे केलेली अपार मेहेनत व नियोजन आता फलस्वरुप होण्याची लक्षणे दिसु लागत

होती, मात्र नेताजी म्हणजे दिवास्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता तर तो एक द्र्ष्टा नेता होता. संपूर्ण

तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवुन तो निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते

 

आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी

नसून आपल्या देशातील बांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते.

किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडुन परकिय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व

स्वातंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतुन उठाव करेल व या दुहेरी पात्यांत परकियांचा निभाव

लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता.

मात्र यासाठी आपल्या देशवासियांना azad hind sena आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र

हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. हे अत्यंत

कठिण होते हेही त्यांना माहित होते. एकिकडे धूर्त इंग्रजांनी चालविलेला अपप्रचार -जे खोडसाळपणे आझास

हिंद सेनेचा उल्लेख अत्यंत तुच्छतापूर्वक ’जिफ्स’ असा करीत असत.

 

प्रत्यक्ष आपल्या मातृभूमित ही परिस्थिती तर जगात आपल्या सेनेचे काय स्थान असेल? काय प्रतिमा असेल?

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास जागतिक पाठिंबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नेताजींनी अभ्यासले होते.

इतकेच नव्हे तर आपण व आपले सेनादल हे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून या प्रयत्नात सर्व स्वातंत्र्यवादी

अशियाई राष्ट्रे तसेच पाश्चिमात्य राष्ट्रे यांनी एक स्वातंत्र्योन्मुख राष्ट्र म्हणुन आपल्या मागे उभे राहिले पाहिजे ही

नेताजींची महत्त्वाकांक्षा होती. एखाद्या व्यक्तिला वा संघटनेला पाठिंबा देणे वा व्यक्तिश: मदत करणे आणि

युद्धात एखाद्या राष्ट्राने न्याय्य वाटणाऱ्या राष्ट्राची बाजु घेणे यांत जमीन -अस्मानाचा फरक होता. आझाद हिंद

सेना azad hind sena म्हणजे कुणी व्यक्तिगत लाभासाठी वा आपल्या हेक्यासाठी उभारलेली मोहिम नव्हती तर

ती एका संग्रामस्थ राष्ट्राची अस्मिता होती. आणि म्हणुनच तिला वा तिच्या पाठीराख्या मित्रराष्ट्रांना नेताजी बदनाम

होऊ देणार नव्हते, तर ते आपला संग्राम युद्धनितीला व संकेताला अनुसरून आपला व आपल्या राष्ट्राचा हक्क

मिळविण्यासाठी न्याय्य मार्गाने लढणार होते.

 

ज्या कारणास्तव शिवरायांनी राजमुकुटाची यत्किंचितही आसक्ती नसताना रायगडावर स्वत: ला राज्याभिषेक

करवुन घेतला आणि स्वराज्य स्थापनेची घोषणा केली, नेमक्या त्याच उद्देशाने नेताजींना आझाद हिंदचे हंगामी

सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला. इथे पुन्हा एकदा नेताजींवरील शिवचरित्राचा प्रभाव दिसुन येतो. आपले लष्कर

म्हणजे कुणा लुटारूंची टोळी नव्हे, कुणा सत्ताबुभुक्षिताची फौज नव्हे, कुणी अत्याचारी जमाव नव्हे तर हिंदुस्थान

स्वतंत्र करण्यासाठी वचनबद्ध आणि धेयासक्त असलेले देशभक्त संघटित होऊन व स्वत:च्या भावी स्वतंत्र राष्ट्राचे

प्रातिनिधीक असे सरकार स्थापून साऱ्या जगाला ग्वाही देणार होते की आम्ही आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी

आमच्या राष्ट्रध्वजाखाली ,आमच्या सेनानीच्या अधिपत्याखाली उपलब्ध त्या सर्व मार्गांनी आणि सहकार्यानी

लढणार आहोत आणि हा संघर्ष आता स्वातंत्र्यप्राप्तीतच विलिन होईल. आता कुणी आम्हाला गद्दार, फितुर, लोभी,

भ्याड वा परक्यांचे हस्तक म्हणु शकणार नाही कारण आता आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन करीत

असून जे आमच्या बरोबर येत आहेत ते आमच्या राष्ट्राला मान्यता देऊन व आमच्या स्वातंत्र्याचा आदर राखुन

आम्हाला मित्र राष्ट्र म्हणुन पाठिंबा देत आहेत, मात्र स्वातंत्र्य हे आमचेच असेल व त्यासाठी जेव्हा जेव्हा रक्तपात

होइल तेव्हा सर्वप्रथम रक्त आमचे सांडेल!

 

दिनांक १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली. दिनांक १७ ऑगस्टला नेताजींनी सायागाव

विमानतळ सोडले दिनांक १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमानतळावरून त्यांनी प्रयाण केले. विमानाने अकस्मात

पेट घेतला. भडकत्या ज्वालांच्या प्रकाशात इतिहासाने तेजाची अखेरची आरती केली.

अशा या आझाद हिंद azad hind sena अधिपती नेताजी सुभाष चंद्र बोस

यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Leave a Reply

error: Content is protected !!