- meghraj rajebhosale news
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ – श्री. मेघराजभैय्या राजेभोसल
अखिल भारतीय मराठी चित्रपट _महामंडळ व नाट्यपरिषद _अध्यक्ष व फिल्म फेडरेशन _ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष _सर्वांचे लाडके श्री.मेघराज भैय्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजभैय्या राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन आॅफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गोवा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमधे ही निवड करण्यात आली. फिल्म फेडरेशन आॅफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही देशातील सर्वाधिक सदस्य असलेली संस्था आहे.
भैय्यांच्या निवडीने मराठी चित्रपटसृष्टी व मराठी चित्रपट महामंडळाकडून स्वागत करण्यात आले. फिल्म फेडरेशनच्या गोवा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
भैय्या यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे अखील भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.भैय्यांच्या निवडीने आम्हा सर्व कुटुंबियांना अतिशय आनंद झाला आहे. इंदापुर तालुक्यातील सनसर सारख्या खेड्यातून डोळ्यात अनेक स्वप्नं घेऊन महाविद्यालय शिक्षणासाठी भैय्या पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील वैभवशाली अशा सांस्कृतिक वारसाचे जतन करण्याच्या उद्देशाने हळूहळू विसरत चाललेली लोककला नवीन पिढीच्या समोर सादर व्हावी व त्यांना आपली लोककला समजावी या ऊद्देशाने भैय्याने अत्यंत तळमळीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली .त्यासाठी प्रथम त्यांनी चौफुला “पांडव इंटरप्राईजेस “या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी महाराष्ट्राची लोककला असणारी लावणी सादर करण्यास सुरुवात केली.
ही कला भैय्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवली .मेघराज भैय्या यांनी ‘लंडनची सुन इंडियात हनिमून’ या नाटकाद्वारे नाट्य निर्मितीची सुरुवात केली .आणि नंतर ‘घाशीराम कोतवाल ‘या गाजलेल्या नाटकासह इतर तीन नाटकांची निर्मिती केली. भैय्यांनी आत्तापर्यंत निर्माता म्हणून १४ मराठी नाटकांची आणि पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली.
अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवांमध्ये भैय्यांची आणि माझी प्रथम ओळख झाली.त्यावेळी मनामध्ये एक विचार येऊन गेला. आपल्या चांगल्या घरातला हा मुलगा या क्षेत्रात कसा काय आला ? या मुलाला घरातून कसाकाय पाठिंबा मिळणार ? या मुलाला कोण सपोर्ट करणार ? विरोध मात्र नक्कीच खुप होणार होता. भैय्या ज्या घरातून आले त्या घरातील लोकांना त्यांचे लावणीचे कार्यक्रम नक्कीच आवडणारे नव्हते. तरीही भैय्यांनी आपले कार्य नेटाने असेच पुढे चालू ठेवले.

meghraj rajebhosale
थोड्याच कालावधीमध्ये भैय्यांनी आपल्या कारकीर्दीचे पंख हळूहळू पसरावयास सुरुवात केली. कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे ऊभे केले. एका छोट्याशा खेड्यागावातून काहीतरी करून दाखवायचे आहे या उद्देशाने येणारा एक मुलगा पुण्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात भक्कम पाय रोवून उभा राहतो ही किती अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
या क्षेत्रात ठराविक लोकांचीच मक्तेदारी आत्तापर्यंत पहायला मिळत होती .परंतु भैय्यांनी ही मक्तेदारी मोडीत काढून मराठी माणूस कुठेही कमी नाही हे दाखवून दिले व हळूहळू हा गोवर्धन पर्वत अतिशय लीलया उचलून धरला. भैयांचे हे यशाचे शिखर काही लोकांच्या डोळ्यात खुपत होते. परंतु भैय्या एक सच्छा मराठा आणि भोसले कुटुंबियात जन्म घेऊन आलेले होते. एक मराठी माणूस पुढे जातो हे फारसे लोकांना रुचत नाही .तरीही भैय्यांनी या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आपले कार्य प्रामाणिक पणे पुढे चालूच ठेवले. आपल्या शिवछत्रपतींचा वारसा आहे कितीही कोणी विरोध केला तरीही आपल्या ध्वेयापासून तसुभरही न हलता आपले कार्य नेटाने पुढे चालूच ठेवायचे.
भैय्या अल्पावधीतच सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय लोकप्रिय झाले. सद्यपरिस्थितीत ते मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेकांसाठी आदर्श आहेत. या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांना भैय्या म्हणजे फार मोठा आधारवड वाटतो.भैय्यांनी ग्रामीण भागातुन येऊन कोणत्याही पाठिंब्याशिवाय आपला अत्यंत अभिमानास्पद प्रवास चालू ठेवला.
भैय्यांची पार्श्वभूमी ही सांस्कृतिक क्षेत्रातील तर मुळीच नव्हती. यांच्या पाठीशी राजकीय शक्तीही नव्हती. ज्यांच्या शिडीचा आधार घेऊन ते वर चढू शकतील असेही घरात कोणी नव्हते. भैय्यांनी मात्र स्वकर्तृत्वावर हे यश संपादन केले. त्यामुळे भैय्यांचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.
भैय्यांबरोबर त्यांच्या पत्नी सौ.हेमलता राजेभोसले यांनीही भैय्यांना या कार्यामधे संपूर्णपणे पाठिंबा दिला आहे. स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय पुरुष कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करू शकत नाही. त्यामुळे हेमलता राजेभोसले त्यांचेही खूप खूप अभिनंदन.

meghraj rajebhosale family