Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Ajit Pawar – असा रचला डाव त्याचे अजित पवार नाव !!

1 Mins read

Ajit Pawar –  असा रचला डाव त्याचे अजित पवार नाव !!

 

Ajit Pawar Wife Interview –  सुनेत्रा अजितदादा पवार

 

 

22/7/2021,

दे टाळी तुला घे टाळी मला ..असं म्हणत हात बाजूला केला कि टाळी देणाऱ्याचा पोपट होतो. लहानपणी असे खेळ खेळायचो. २३/११/२०१९ रोजी पहाटे झालेला मेलोड्रामा संपूर्ण महाराष्ट्रानेच न्हवे तर जगाने पाहिला. नागपूर च्या छोऱ्याला कसं कळणार . मी पुन्हा येईन म्हणत पोपट झाला ? या टाळीच त्या टाळीला कळून पण द्यायचे नाही आणि टाळीचा आवाज झाल्याचा भास देखील करून द्यायचा. अजित पवार Ajit Pawar हि खेळी खेळून गेले आणि त्यांनी त्यांची राजकीय मसुद्देगिरी जगाला दाखविली. फडणवीस यांचे तोंड त्या दिवसानंतर पुन्हा येईन म्हणण्या पुरते देखील हसरे राहिले नाही. आज ही खुर्ची शिवाय त्यांची फडफड संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. बुद्धिबळाच्या पटलावरचा वजीर महाराष्ट्राला मिळाला. हाजीर तो वजीर या म्हणीला अजित तो वजीर असा पर्याय म्हणीचा मिळालाय असं म्हणू शकतो. आज महाराष्ट्राच्या याच वजिराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने घरामध्ये हा वजीर हाजीर असतो का कि लाजीर असतो ऐकुया सुनेत्रा अजित पवार यांच्या तोंडून.

Ajit Pawar Wife interview - सुनेत्रा अजितदादा पवार

Ajit Pawar Wife interview – सुनेत्रा अजितदादा पवार

महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे त्यामध्ये प्रत्येक मंत्र्यामागे कर्तबगार स्त्री उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे रश्मी ठाकरे वहिनी खंबीर उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राने पाहिल्या, अत्यंत सयंत आणि संयमी स्वभावाच्या रश्मी वहिनी शिवसेनेची धुरा आतून खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत असल्यामुळे आज उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व करोनाच्या काळात सुद्धा दमखमबाज मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे लाडके दंबग उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या लाडक्या धर्मपत्नी सुनेत्रा अजितराव पवार. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊया अजित पवार साहेब आणि त्यांच्या नात्याविषयी. सुनेत्रा पवार यांना पहिला प्रश्न हाच की तुमचा राजकीय सहभाग किती असतो आणि कसा यावर सुनेत्रा वहिनींनी अजित साहेबांच्या राजकीय सहभागातील माझे सहकार्य हाच माझा सहभाग असे सहज उत्तर देऊन त्यांच्या सपत्नीत्वाचा साह्चर्याचा दाखला दिला. पुढे काय विचारायचे हेच कळेना. मग मनात विचार आला फार किचकट आणि अडचणींचे प्रश्न टाकले तर माझीच दांडी गुल व्हायची म्हणून मी त्यांच्या इतिहास भूगोल याकडे वळलो. कुटुंबाची पार्श्वभूमी आणि अजित पवारांची पहिली भेट अशा प्रश्नांबद्दल सुनेत्रा वहिनी अगदी मनमोकळे पणाने माहेरवाशिनी सारख्या सांगू लागल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची आणि ती ही डॅशिंग अजित पवार यांची पत्नी असून देखील त्यांच्या मनात अहंकाराचा लवलेशही दिसला नाही उलट एका खंबीर स्त्री चा हळवा कोपरा दिसला. त्या सांगू लागल्या, मलबार हिलवरच्या देवगिरी बंगल्यावर मा. अजितदादांच्या पत्नी सौ. सुनेत्रावहिनी झाडाला पाणी घालत घालत चहा नाश्त्यासाठी विचारपूस करून मागवून राहिल्या, दुपारी चारची वेळ अगोदरच ठरली होती, सुनेत्रावहिनींनी चारची वेळ अशासाठी दिली होती, की जय आणि पार्थ यांचा गप्पांत डिस्ट्रबन्स नको. बायकांच्या गप्पा माहेरपासूनच सुरु होणार, हे माहीत असल्यामुळे सुरुवात माहेरापासून झाली आणि
सुनेत्रावहिनी सांगू लागल्या, “माझं माहेर तेर. माझे वडील तेर गावचे पाटील. पाटीलकीचे तेरावे
गाव, म्हणून तेर म्हणतात. माहेर खूपच चांगलं, सधन, एकत्र कुटुंबपद्धती असलेलं आहे. वडिलांना तीन बायका, आम्ही सगळी भावंड मिळून तेरा. आम्ही मूळचे राजे निंबाळकर; परंतु वडील दत्तक गेल्यामुळे आम्ही पाटील आडनांव लावतो. मा. डॉ. पद्मसिंह पाटलांची मी बहिण.”
सौ. सुनेत्रावहिनी माहेरविषयी न थकता सलग कितीतरी गोष्टी सांगत होत्या, आणि भारावून गेल्यासारखे आम्ही सुद्धा ऐकत होतो.

Ajit Pawar -  असा रचला डाव त्याचे अजित पवार नाव !!

Ajit Pawar – असा रचला डाव त्याचे अजित पवार नाव !!

तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, की माहेरची सुखसमृद्धी, वडीलांबद्दलच्या अभिमान,
एकत्र कुटुंबपद्धतीबद्दलचा स्वाभिमान व घरातील सर्व लोकांबद्दलचं प्रेम
वहिनींच्या शब्दाशब्दांतून व चेहऱ्यावरुन जाणवत होते. वहिनींना माहेराचा जितका अभिमान तितका पवार घराण्याचा आणि शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाची साथ, घरातील मोठी वडीलधारी मंडळी यांच्याबद्दल वहिनींना प्रचंड अभिमान त्यांच्या बोलण्यातून वाक्यावाक्याला जाणवत होता.
वहिनींनी अभिमानानं सांगितलं, “आम्ही खानदानी मराठा-गोशा पद्धत पाळणारे; पण पंधरा-
वीस वर्षांपूर्वी वडिलांनी मला औरंगाबादला हॉस्टेलवर राहून सरस्वती कॉलेजमध्ये शिकायला परवानगी दिली. तेर पासून औरंगाबाद दूरच, त्यात मी मुलगी पण वडिलांनी परवानगी दिल्यामुळंच मी वाणिज्य शाखेची पदवी घेऊ शकले. वहिनींनी शिक्षणाची गोडी आणि आवड यावर आपले मत मांडले, स्त्री शिक्षणाबद्दल त्याची भूमिका आग्रही दिसली. राजकीय च नाही तर सामाजिक भूमिकेविषयी त्यांचे मत आपसूकच समजले. मग शिक्षण त्यानंतर लग्न आणि संसार, घर परिवार त्यात राजकीय वारसा असलेले पवार घराणे मग लग्नाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आता शिगेला लागली होती. लग्न कसे अरेंज कि लव्ह यावर वहिनी अशा काही लाजल्या की जणू अजित पवार साहेबांनी Ajit Pawar हात हातात घेऊन लग्नाची मागणी घातली जणू. मग पुढचे प्रश्न आणि भडीमार सुरु झाला.
“विवाह ठरवूनच झाला असेल ? पतीविषयी काय अपेक्षा होत्या ?” यावर त्या म्हणाल्या.
“माझं लग्न ठरवूनच झालं. त्या वेळी प्रेमविवाह करणं हा कन्सेप्टच
नव्हता. आम्ही शिकायला बाहेर असलो, तरी घरचं दडपण व भीती
होती. इतका मोकळेपणा नव्हता, कुटुंबवत्सलता आणि विनम्रता वहिनींच्या या उत्तरामुळे वहिनींच्या अंगी असलेली आम्हाला पाहायला मिळाली. आपल्या होणाऱ्या पतीविषयी अपेक्षा आणि तसा विचार करायला वेळच मिळाला नाही. अपेक्षा करेपर्यंतच लग्न झालं. त्यामुळे पतीविषयी नक्की कोणत्याच अपेक्षा नव्हत्या. घरातील मोठी माणसं जो निर्णय घेतील, तो योग्यच, त्यामुळं स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हतो.” त्यामुळे निर्णयक्षमता अंगी असली तरी थोरा मोठयांच्या निर्णयाला योग्य ठरवण्याची क्षमता त्यांच्यात होती म्हणूनच एका यशस्वी उपमुख्यमंत्री आणि नेतृत्वाच्या मागे आज त्या धीरोदात्तपणे उभ्या आहेत.
आम्हा दोघांच्या आवडी-निवडी बहुतेक सारख्याच आहेत. वैचारिक दृष्ट्याही आमचं जुळतं, फारसे काही मतभेद नाहीत.
“वहिनी, अजितदादांना Ajit Pawar राजकारणात प्रवेश कसा केला ? “प्रवेश असा अचानक नाही. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळं दादा स्थानिक
राजकारणात होतेच. मा. पवारसाहेब खासदार झाले आणि दादा राजकारणात सक्रिय झाले. स्थानिक राजकारण व साखर कारखाना हे
सर्व पाहतपाहत महाराष्ट्राच्या राजकारणात आले. सुरुवातीपासूनच दादांचा लोकसंपर्क, लोकसंग्रह मोठा होता. हळू हळू तो आणखी वाढत गेला, काम करण्याची पद्धत, जिद्द, चिकाटी आणि पवार घराण्याची पार्श्वभूमी यांमुळे त्यांच्यातले नेतृत्व बहरायला आणि पुढे यायला फारसा वेळ लागला
नाही.”
“राजकारणातले डावपेच, कुशलता, निर्णय क्षमता ज्यांमुळं मंत्रिपदापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य
झालं.”

Ajit Pawar Wife Interview -  सुनेत्रा अजितदादा पवार

Ajit Pawar Wife Interview –  सुनेत्रा अजितदादा पवार

“कोणताच एक क्षण निर्णायक नसतो आणि कोणताही एक निर्णय
मंत्रिपदार्यंत पोहोचवत नसतो. तुमच्या राजकीय कर्तबगारीला थोडी
घरच्यांची, मोठ्या माणसांची साथ लागते.” यावरून वहिनींनी घरातील थोरा मोठयांची पुण्याई आणि त्यांचा आशीर्वाद, सहभाग याला कधी यशामागे लपवले नाही.
समाजकार्याबद्दल वहिनी सतत सक्रिय राहतात. त्या म्हणाल्या, समाजकार्य आणि ते करताना स्वतःला वाहताना ते कसे पूर्णत्वास नेता येईल याकडे माझा कल असतो. त्यामुळे त्याबद्दल ज्या अपेक्षा असतात त्या पूर्णत्वास घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो “ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या, लोक, नातेवाईक, कार्यकर्ते आले, गेले याचा कधीच त्रास होत नाही, उलट लोकांची आवडच आहे. माहेरी आणि सासरी ह्याबाबतीत एकच वातावरण आहे.”तुमच्यासाठी दादा किती वेळ देऊ शकतात?” असं विचारलं, तेव्हा वहिनी म्हणाल्या, राजकारणातल्या व्यक्तीला स्वतःसाठी फार वेळ
देता येत नाही आणि त्याबद्दल माझी नाराजी नाही. बारामतीचं कार्य, उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाची जबाबदारी, लोक येत असतात,
कधी महिना-महिना दादा दौऱ्यावर राहतात. ह्या गोष्टींची सवय झाली आहे. उलट त्यांनी वेळ दिला तर चुकल्यासारखं वाटतं.
मुलांना मंत्र्यांची मुलं म्हणून वेगळी वागणूक मिळू नये. असा माझा प्रयत्न असतो.” वहिनी सांगत होत्या, “माझ्या मुलांना शाळेत प्रवेश
घेताना त्रास झाला; परंतु मी मोठ्या साहेबांचं किंवा दादांचं नातं काही सांगितलं नाही. शाळेत जेव्हा हे माहिती झालं, तेव्हा मला शाळेनं
विचारलं, की हे तुम्ही अगोदरच का सांगितलं नाही ?” यावरून सामान्यपणे सार्वजानिक जीवनात वहिनी स्वतःला गुंतवून घेत असल्याचे दिसून आले.
“अन्य मंत्र्यांच्या पत्नींशी कसे संबंध आहेत ?” असं विचारलं, तेव्हा सुनेत्रावहिनी म्हणाल्या, “जेवढे ओळखीचे आहेत, या सर्वांशी चांगलेच आहेत. नातेवाईक,
मैत्रिणींशीही पूर्वी होते तसेच आहेत.” ‘आपणाला राजकारणात येणं आवडेल का ?” असं विचारलं, तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, “नाही, राजकारणात येणं कधीच आवडणार नाही; पण दादांना मी जे काही सहकार्य देते, तोच माझ्या राजकारणाचा भाग नाही का ?” आज साहेबांचा वाढदिवस .. प्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सहकार्याला आपल्या कर्माचा भाग समजणारया सुनेत्रा वहिनी जरी राजकारणात येणार नसल्याचे म्हणत असल्या तरी ही त्यांची राजकीय मुसुद्देगिरी तरी नाही अशी शंका आली. कारण महाराष्ट्राच्या भावी स्त्री मुख्यमंत्र्याची सर्व समर्थपणे पेलून नेणारी क्षमता कोणी आपणहून सांगत नाही. पुन्हा भेटू पुन्हा नवीन विषयावर बोलू असे म्हणत त्यांच्याशी सुरु असलेली मुलाखत संपवली आणि त्यांचा निरोप घेतला.

 

 

 

Postbox India Editorial
www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

%d bloggers like this: