Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHealth

Acupuncture images – अंक्युपंक्चर वैद्यक अभ्यासक्रमाचा अवलिया

1 Mins read

 

Acupuncture images – अंक्युपंक्चर वैद्यक अभ्यासक्रमाचा अवलिया

 

 

 

करोना साथरोगाने संपूर्ण जगात थैमान घातल्यानंतर मानवी जीवन आणि औषध उपचार शास्त्राच्या पद्धतीबाबत काही मर्यादा असल्याचे जगासमोर आले. तथापि या जगातील मनुष्यप्राणी हा प्रत्येक संकटावर जिद्द व असीम कष्टाच्या जोरावर मात करीत आला आहे. भीती, भय या विकारावर ज्यांनी विजय प्राप्त केला तो व्यक्ती कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरा जाण्यास सिद्ध होता. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपण आपले कोणतेही मिशन यशस्वी करु शकतो ही सकारात्मक विचार करण्याची मानसिकता आपण मनाशी बाळगली तर अशक्य काही नाही. हे मुंबईतील गिरगावचे प्रख्यात सर्जन डॉ. आर. एफ. बेहरामजी यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.

अत्यंत निर्मळ, निरागस, प्रेमळ, विशाल मानवी दृष्टीकोण असलेले डॉ. बेहरामजी हा माणूस वैद्यक शास्त्रातील मोठा अवलिया आहे. प्र्रचंड साधनसंपत्ती असताना नेहमी आपले पाय जमिनीवर ठेऊन समस्त मानवजातीसाठी गगनाला गवसणी घालणारा हा व्यक्ती खूप मोठा आहे. जेथे सरशी तेथे पारशी अशी आपल्याकडे एक म्हण प्रचलित असली तर त्याचा मतितार्थ सर्व ठिकाणी लागू होत नाही. असीम कष्ट, जिद्द आणि संत ज्ञानेश्वर यांनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानातून वैश्विक सुख शांती समाधानासाठी मनाभावे प्रार्थना केली. त्या ताकदीचा हा अत्यंत साधा माणूस मनाने श्रेष्ठ आणि अखिल मानवतेसाठी विचार करणारा व्यक्ती आहे.

आमच्या मैत्र गोतावळ्यात एका व्यासंगी मित्राने डॉ. बेहरामजी यांची ओळख गिरगावच्या क्लिनिकमध्ये करुन दिली. आणि मी या माणसाच्या प्रेमात पडलो ते कायमचाच. काही चांगली माणसे आपल्याला भेटणे अथवा त्यांच्या सहवास, सान्निध्य लाभणे हे आपले पूर्वाश्रमीचे संचितच म्हणावे लागले. डॉ. बेहरामजी यांचे एकुलते एक चिरंजीव डॉ. शहजाद यांनी अमेरिकेतून अंक्युपंक्चर वैद्यक शास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पदवी संपादन केली होती. पण डॉ. शहजाद यांना त्या अमेरिकेच्या पदवीवर भारतात प्रॅक्टिस करणे भारतीय कायद्यानुसार शक्य नव्हते. Acupuncture images – अंक्युपंक्चर वैद्यक शास्त्राला महाराष्ट्रात कायद्याची मान्यता मिळवून देणे. त्यासाठी देशाला पुरोगामी विचारांची दिशा देणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळात कायदा संमत करुन घेणे असे स्वप्न डॉ. बेहरामजी यांनी पाहिले होते. अर्थात हे मिशन कठीण व मोठे होते. पण डॉ. बेहरामजी यांचा स्वभाव आणि कार्यपद्धती पाहता ते मिशन फत्ते करण्याचा संकल्प आम्ही मित्र मंडळींनी केला.

डॉ. बेहरामजी यांचा अखिल मानवजातीसाठी तात्विक विचार लक्षात घेऊन, बहुजन विकास आघाडीचे लोकनेते, ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर, प्रख्यात व्यावसायिक प्रवीण राऊत, दया नाना म्हात्रे, अड, स्वाती सागवेकर. मंत्रालयातील माजी अधिकारी आर. सी. पाटील अशा मंडळींनी प्रयत्न करायचे ठरविले. या कामी डॉ. बेहरामजी यांचा विशाल सर्व क्षेत्रातील मैत्र परिवारही कामाला आला.
अंक्युपंक्चर ही वैद्यक उपचार शास्त्रातील प्रभावी पद्धत आहे. यात अल्प खर्चात आणि कोणतेही साईट इफेक्टस नाहीत. सुमारे ८०० वर्षापासून Acupuncture images – अंक्युपंक्चर वैद्यक उपचार पद्धत चीन, जपान आणि कोरिया या देशात प्रचलित आहे.

पण या उपचार पद्धतीचा उगम भारत देशात झाल्याची काही तज्ञांचा दावा आहे. या उपचार पद्धतीला सांप्रदायिक, अध्यात्मिक आधार आहे असे बोलले जाते. त्या वादात जाण्याचे आपण कारण नाही. शिवसंप्रदायात उदयाला आलेल्या नाथ संप्रदायाकडून सूफी पंथियांनी ही विद्या अवगत केली. आणि त्यांच्याद्वारे या विद्येचा जगभर प्रचार व प्रसार झाला असे काहींचे म्हणणे आहे. Acupuncture images – अंक्युपंक्चर पद्धतीद्वारे सुमारे ३९ हून अधिक आजार बरे होतात असे हे शास्त्र सांगते.

मानवाचा देह सचेतन आहे. या सचेतनामध्ये लपलेला चेतना हा शब्दच चैतन्य या संकल्पनेशी नाते सांगून जातो. शरीराला वाढ, स्फूर्ती, उर्मी, आरोग्य आणि क्रयशक्ती देणाऱ्या या ऊर्जास्तोत्राला शास्त्रीय भाषेत प्राणशक्ती म्हणतात. हीच प्राण शक्ती विविध कारणांनी शरीराच्या विशिष्ट भागास कमी मिळाल्याने अथवा अजिबात न मिळाल्यामुळे शरीराच्या अवयवामध्ये आजाराची निर्मिती होते. हा Acupuncture images – अंक्युपंक्चरच्या आजाराबाबतचा सिद्धांत आहे.

विषाणु, जीवाणू, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास ही अलोपॅथिक मेडिसीनने सांगितलेली काही कारणे आहेत. या सिद्धांताने अंक्युपंक्चरच्या संदर्भात ऊर्जाशक्तीच्या अभावाने सुरु झालेल्या शरीराच्या ऱ्हासाचे हे परिणाम आहेत. ऊर्जाशक्ती शरीराच्या सर्व भागांमध्ये पसरण्यासाठी ज्या मार्गाचा वापर करते. त्या मार्गांना मेरिडिअन्स असे Acupuncture images – अंक्युपंक्चरच्या भाषेत म्हटले जाते. शरिराचे विच्छेदन केल्यानंतर शरिरात रक्तवाहिन्या. मज्जातंतू, अस्थि जशा दृष्टीस पडतात. तसे मेरिडिअन्स सापडत नाहीत.

ह्या मेरिडीअन्सवर अनेक परिणामकारक बिंदू असतात. ह्या बिंदूवर दाब दिला असता अथवा त्या बिंदुना सुईने उत्तेजित केले असता आपणाला जे निकाल त्या आजाराच्या संदर्भात मिळतात ते आश्चर्यकारक आहेत. संपूर्ण शरीरभर पसरलेल्या मेरिडिअन्सच्या जाळ्यामुळे ही प्राणशक्ती प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असते. प्रत्येक पेशीला चेतना देत असते. अंक्युपंक्चर उपचार पद्धतीमुळे शरीराच्या सर्व मेरिडिअन्सचा अभ्यास, त्यावरील सर्व बिंदुचा अभ्यास, उपचारासाठी एक किंवा अधिक बिंदुंचा केला जाणारा वापर, मेरिडिअन्सच्या बिंदुवर सुई अलगद टोचणे असा अंक्युपंक्चर असतो असे हे शास्त्र सांगते.

याच्या तपशीलात जाणे हा तज्ञ व्यक्तींचा प्रांत आहे. मुळात Acupuncture images – अंक्युपंक्चर उपचार पद्धतीला शासन मान्यता मिळणे आणि त्यासाठी प्रॅक्टिशनर्सना कायद्याचे कवचकुंडल लाभणे यासाठी महाराष्ट्रात नवीन विधेयक संमत करुन घेण्याची मोठी किचकट प्रक्रिया होती. तथापि, दोन्ही काँग्रेस आघाडी सरकारमधील तत्कालीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी याकामी सरकारी पातळीवर मोठे पाठबळ दिले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळ सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. लोकनेते हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर, माजी आ. विलास तरे, सर्वपक्षीय आमदारांनी तसेच विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे आदींनी विधेयक सभागृहात संमत होण्यास मदत केली.

Acupuncture images – अंक्युपंक्चर उपचार पद्धतीला मान्यता देणे, त्या उपचारपद्धतीचा अभ्यासक्रम निश्चित करणे तसेच यासंदर्भात उपचार करण्यास प्रॅक्टिशनर्सना परवाने देण्यासाठी कायद्यानुसार महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अंक्युपंक्चरची स्थापना झाली. या कौन्सिलचे प्रथम मानद चेअरमनपद भूषविण्याची संधी डॉ. बेहरामजी यांनी मिळाली आहे. त्यांच्या टीममध्ये डॉ. चंद्रशेखर परदेशी, डॉ. पी. बी. लोहिया, डॉ. हेमंत जे. ठक्कर, श्रीमती विद्या नाईक, डॉ. अभय कुलकर्णी, रजिस्ट्रार नारायण नवले आणि कार्यालयातील मनुष्यबळ कार्यरत आहे. या कौन्सीलने राज्यातील साडेसहा हजारांपेक्षा अधिक अंक्युपंक्चर प्रॅक्टिशनर्स हा व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना दिला आहे हा या क्षेत्रातील ऐतहासिक दिवस असल्याचे डॉ. बेहरामजी यांनी विनम्रपणे नमूद करतात.

या यशस्वी मिशनमध्ये अंक्युपंक्चरचे ज्येष्ठ तज्ञ डॉ. देबाशिश बक्षी, डॉ. रमण कपूर, डॉ. इंदजित सिंग, डॉ. जेंटीट, विजय थोरात यांचा पाठिंबा मोठा होता. शिवाय विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री अमित देशमुख, बविआचे नेते आ. हितेंद्र ठाकूर. प्रविण राऊत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. प्रविण शिनगारे, डॉ. सुमंत घैसास अशा अनेकांचा हातभार लागला. त्यांचे आभार मानून डॉ. बेहतरामजी यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात Acupuncture images – अंक्युपंक्चर वैद्यक उपचार पद्धतीला शासकीय मान्यता मिळावी यासाठी माझा मुलगा डॉ. शहजाद यांनी सतत पाठपुरावा केला. त्या मुलामुळे हे काम करण्याची प्रेरणा मिळाली. तो बहुमान स्वीकारण्यासाठी अनपेक्षितपणे डॉ, शहजाद आज आपल्यात नाही याची खंत डॉ. बेहरामजी व्यक्त करतात. तथापि आरोग्य उपचारात अंक्युपंक्चर पद्धती अधिक किफायतशीर आणि प्रभावी ठरेल असा दुर्दम्य आशावाद ते बाळगतात. 

 

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

 

समीर मणियार

 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

 

Leave a Reply

error: Content is protected !!