Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Aanadvan & Tadoba – आनंदवन व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

1 Mins read
  • Aanadvan & Tadoba - आनंदवन व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

Aanadvan & Tadoba – आनंदवन व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प

 

मी १९८५ मध्ये ताडोबा व आनंदवन पहाणेस होतो. त्यावेळी डरकाळी ऐकू आली पण मला व्याघ्र दर्शन झाले नव्हते . आता मात्र परिस्थिती बदलली आहे . वाघांची संख्या चौपट झाली आहे . व्यवस्थापण खूप चांगली आहे.
भारतातीलच नव्हे तर जगाचे पर्यटक ताडोबा अभयारण्याकडे आता जात आहेत .
स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव मिळाले.
६२५ चौ कि मी क्षेत्रावर हा व्याघ्र प्रकल्प साकारला आहे तर बफरझोन मध्ये ११०१ चौ.कि.मी.क्षेत्र आहे
जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी बहुवनसंपदाही आहे.
रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीमधील सध्या सुमारे ८० वाघ आहेत
वाघांव्यतिरिक्त हरणे, बारहसिंगे, चीतळ,बिबट्या, रानमांजरी, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात.

Aanadvan & Tadoba – आनंदवन

१९८५ मध्ये बाबांची गाठ पडली नाही हि कायम रुख रुख लागून राहिली त्यावेळी ते भारतजोडो आंदोलनासाठी बाहेर होते . साधनाताईंची मात्र गाठ पडली .
आनंदवन वर्णनापलीकडचे आहे .
एक गोष्ट नमूद करण्या सारखी म्हणजे आश्रमात तसेच बाबांच्या घरात व अभ्यागतांसाठी एकाच स्वयंपाकघर आहे. सर्वांसाठी एकच स्वयंपाक असतो
कै बाबा आमटे यांनी कुष्ठ रोग्यांचे पुनर्वसन व उपचार यासाठी इ.स. १९५२ साली वरोरा पासून ५ km अंतरावर त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्‍नी श्रीमती साधना आमटे यांनी व त्यांची मुले सुना यांनी साथ दिली
प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात.
सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद,
आम्ही १९८५ मधे गेलो होतो तेव्हा केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य होते .आता आहे कि नाही माहित नाही
आनंदवन आत पुढील ४ ठिकाणी शाखा विस्तार केला आहे सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)

अशोकवन – नागपूर——-लोकबिरादरी प्रकल्प – नागेपल्ली——लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

ताडोबा भेटीचे वेळी चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील मार्कंडेय (मार्कंडा) मंदिर समुह आवर्जून पहा.

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!