Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

FREEDOM EXPRESS

स्वयंपाक – नीलिमा जोशी

1 Mins read

झाडाझडती

घरात आम्ही दोघं च रहातो .दोघंही ज्येष्ठ नागरीक .पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय .त्यामुळे वादाचे तसे विषय आमच्या दोघात आताशा फारसे उदभवत ना हीत .पण एक रंजक प्रसंग मात्र आमच्या घरी आठवड्यातून एकदा अगदी न चुकता घडतो .
आमचा दोघांचाही आहार पहिल्यापासूनच बेताचा .त्यात वयपरत्वे ताव मारून जेवण्यात फारसा रस नाही उरलाय .
पण स्वयंपाक करण्यातला माझा रस मात्र अजूनही टिकून आहे .
चारी ठाव स्वयंपाक करून असं डावी उजवी बाजू भरलेलं ताट बघितलं की माझी भूक चाळवते .त्या ऊलट माझ्या नवरयाचं मत, त्याची भूक म्हणे मरते .एवढे पदार्थ बघून .
“पण स्वयंपाक माझा प्रांत आहे तेव्हा खाण्यापुरतं तू “तोंड” उघड .असं सांगून मी पदार्थ बनवतेच .
कोकणस्थी बाण्याने कितीही मोजून मापून स्वयंपाक केला ना तरी अगदी थोडं काहीतरी उरतच .
ते धड कामवाल्या बाईंना देण्याएवढं ही नसतं.
मग खाऊ संध्याकाळी म्हणून फ्रीज मधे दडपलं जातं .
मग आठवड्यातून एक दिवस फ्रीजची झाडाझडती घेण्याचं काम माझा नवरा आवर्जून करतो .त्यायोगे माझ्यावर टोमणे मारायला त्याला संधी मिळते बहुधा .
एक मोठ्ठी पिशवी घेऊन तो झाडाझडतीत सापडलेलं टाकून देण्यासाठी सज्ज होतो
.खरतर मला खूप वाईट वाटतं अन्न वाया गेलेलं पाहताना .पण नाईलाज असतो हो .दोन चार चमचेच उरलेलं असलं तरी पोटात ढकलून संपवायची क्षमता संपलीय हो .
पण ही झाडाझडती तो खूप रंजकतेने करतो म्हणून बोच थोडी बोथट होते .
एक एक वाटी रिकामी करताना तो पुटपुटत असतो .
सोमवारची कोबीची भाजी .!!!
या या बाहेर.सुकलात कशाने हो ..आमच्या गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं होत का .तुमची बदली करीन पराठ्यात म्हणून ..
जाऊ दे हो ..मंत्र्याचं आश्वासन ते ..पाळतात थोडे .
.
ओहो.. मंगळवरची आमटी का .?तुमची बदली नक्कीच .! गडचिरोलीला होते ना तश्शीच ..!!.फ्रीजमधून कचरयाच्या डब्यात

 

Also Read : https://postboxlive.com/nri-legal-ways-for-nri-to-buy-agriculture-land-in-india/

 

 मागनं कोण डोकावतय??
मुगाच्या डाळीची खिचडी वाटतं ..?.काय हो तुम्ही बुधवारच्या ना ..?.या या …बिरबलाच्या खिचडीसारखीच गत झालीय हो तुमची .ती पकली नाही .ही संपली नाही …शेवट कचरयाच्या डब्यात!!!
अरे वा …गुरवारचं काहीच उरलं नाहीये …दत्ताची कृपाच म्हणायची …आत्ता आठवलं …बाहेर गेलो होतो जेवायला ..
“एक खण झाला गं “.हे माझ्याकडे बघत खिजवल्या सारखं हसत .
“ऊतच आलाय बाबा”!! …अगं तुला नाही म्हटलं ..या शुक्रवारच्या कढीला ऊत आलाय …टाकू ना गं?
हे शेवटचं भांडं दिसतय ..शनिवारची अळूची भाजी …फारच चविष्ट झाला होतात हो तुम्ही पण..फदफदं की हो झालं तुमचं .!!
.रविवारच्या स्वयंपाकाचं भाग्य थोर ..जरा हटके मेनू असल्यामुळे आम्ही संपवतो .किंवा एखादा पाहुणा असतो शेअर करायला .
थोडसं ओशाळत मी ही
हसण्यावारी नेते त्याचा हा उपक्रम
.त्या निमित्ताने
पुढच्या आठवड्यासाठी फ्रीजमधे जागेची सोय होते ना ..
यातला गमतीचा भाग सोडा …थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाच्या घरातली ही कहाणी आहे .यात बरीचशी अपरिहार्यता ही आहे .
पण या वरून स्फूर्ती घेत मी मनाशी ठरवते या आठवड्यात सगळ्या कपाटांची आवराआवर करायची .पण लक्षात येतं की फ्रीज साफ करण्या एवढं हे काम सोपं नाहीये .
.प्रत्येक वस्तूला एक एक आठवण बिलगून बसलीय .तिच्यातून अलगद निर्लेप रहात सुटका करून घेणं जमतच नाही मला
.काश्मिरहून पंचवीस वर्षांपूर्वी आणलेल्या शालीतल्या ऊबदार आठवणी परत शालीची घडी घालून कपाटाच्या कोपरयात जातात .
.तीच गत म्हैसूरहून आणलेल्या रेशमी साडीची होते ..विरत चाललीय तरी हळूवार स्पर्शाची आठवण तिलाही कपाटात माघारी धाडते
.मुलाचा एखादाच इवलासा कपडा मनाच्या तळाशी इतका सुखद पहुडलेला असतो की त्याला दूर करणं जमतच नाही …
आईची आठवण म्हणून ठेवलेली तिची साडी असूदे ..किंवा निरोप समारंभाला मिळालेली साडी असू दे ..आजीने विणलेला जीर्ण झालेला स्वेटर असू दे किंवा पहिल्या पगारातून घेतलेली पर्स ….कपाटातल्या आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न होतात .आणि चिडून मी कपाट आवरण्याचा माझा उपक्रम गुंडाळून टाकते .

Also Visit : https://www.postboxlive.com

भांड्याकुंड्ड्यांचं कपाट आवरायचय,.मिळालेल्या भेटवस्तूंना मार्ग दाखवायचाय .माळा आवरायचाय ..केलेल्या आर्थिक व्यवहाराची तपशीलवार नोंद करायचीय …..यादी तर न संपणारी असते …
स्वतःचा राग यायला लागतो …सुरवातच इतकी डळमळीत करतो आपण की शेवटा पर्यंत पोहोचतच नाही आपण.
म्हणून स्वताःचा उद्धार करायला लागते मी .आणि माझा फ्रीज साफ करणारा नवराच धावून येतो माझ्या मदतीला .
वातावरण हलकं करीत सांगतो ..”अगं outsourcing चा जमाना आहे हा ..मला out source कर हे काम …बघ बघता बघता तुझी कपाटं रिकामी करतो की नाही ते .
एकानी पसरायचं दुसरयानी आवरायचं …

 

 

नीलिमा जोशी

Leave a Reply

error: Content is protected !!